बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी तिच्या फिटनेस आणि बोल्ड लुकमुळे नेहमीच चर्चेत असते. लवकरच ती 'मलंग' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. दिशा पाटनी सध्या तिच्या आगामी सिनेमामुळे सतत चर्चेत आहे. खासकरुन या सिनेमातील तिच्या बोल्ड लुकची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली होती. सध्या दिशा ‘मलंग’ सिनेमाचं जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. या दरम्यान तिनं नुकतच एक फोटोशूट केलं त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दिशा पाटनीनं तिचे हे फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. पर्पल कलरच्या या ड्रेसमध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. तिचा हा लुक खूप पसंत केला जात आहे. दिशाच्या मलंग लुकप्रमाणं तिचा हा लुक सुद्धा सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या तिच्या फोटोंना आतापर्यंत 12 लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाल्या आहेत. दिशा पाटनी आणि आदित्य रॉय कपूर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असलेला 'मलंग' सिनेमा येत्या 7 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.