• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • Bank Strike Today: बँक ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, आज संपामुळे कामकाज विस्कळीत होण्याची शक्यता

Bank Strike Today: बँक ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, आज संपामुळे कामकाज विस्कळीत होण्याची शक्यता

Bank Strike Today: अखिल भारतीय कर्मचारी संघ (AIBEA), अखिल भारतीय बँक अधिकारी संघ (AIBOA) आणि भारतीय बँक कर्मचारी महासंघ यांनी देखील संपामध्ये सहभागी होण्याची घोषणा केली आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर: केंद्रीय कामगार संघटनांच्या (Central Labor Organizations) एकदिवसीय देशव्यापी संपामुळे (Bharat Bandh Today) गुरुवारी देशभरातील बँकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. भारतीय मजूर युनियन वगळता दहा केंद्रीय कामगार संघटनांनी केंद्र सरकारच्या विविध धोरणांच्या विरोधात गुरुवारी (26 नोव्हेंबर 2020) संप पुकारला आहे. आयडीबीआय बँक (IDBI Bank) आणि बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra) यांच्यासह अनेक बँकांनी बुधवारी शेअर बाजारांना सांगितले की संपामुळे त्यांची कार्यालये आणि शाखा विस्कळीत होऊ शकतात. अखिल भारतीय कर्मचारी संघ (AIBEA), अखिल भारतीय  बँक अधिकारी संघ (AIBOA) आणि भारतीय बँक कर्मचारी महासंघ यांनी देखील संपामध्ये सहभागी होण्याची घोषणा केली आहे. AIBEA ने त्यांच्या एका निवेदनात असे म्हटले आहे की, लोकसभेने अलीकडेच व्यवसायात सुलभता आणण्याच्या नावाखाली तीन नवीन कामगार कायदे केले आहेत. ते पूर्णपणे कॉर्पोरेट हिताचे आहे. सुमारे 75 टक्के कर्मचार्‍यांना कामगार कायद्याच्या कक्षेतून वगळण्यात आले आहे आणि त्यांना नवीन कायद्यांतर्गत कायदेशीर संरक्षण नाही. (हे वाचा-भारतामध्ये मोफत असेल Google Pay,या देशामध्ये मनी ट्रान्सफर सेवेसाठी लागणार शुल्क) एआयबीईए ही संस्था भारतीय स्टेट बँक आणि इंडियन ओव्हरसीज बँकेचे कर्मचारी वगळता जवळपास सर्व बँक कर्मचार्‍यांचे प्रतिनिधित्व करते. विविध सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील काही जुन्या बँकांसह ठराविक विदेशी बँका देखील एआयबीईए च्या सदस्य आहेत. बँकांचे खाजगीकरण आणि क्षेत्रातील विविध नोकऱ्यांना आउटसोर्स करणे हे बँक कर्मचाऱ्यांच्या विरोध प्रदर्शनाचे मुख्य कारण आहे. (हे वाचा-उद्यापासून बदलणार लक्ष्मी विलास बँकेचे नाव, 20 लाख ग्राहकांवर काय होणार परिणाम) याशिवाय बँक कर्मचार्‍यांच्या मागणी क्षेत्रासाठी पुरेशी संख्या असलेल्या कर्मचार्‍यांची भरती करणे आणि बड्या कॉर्पोरेट ग्राहकांवर-ज्यांनी कर्ज चुकवले आहे त्यांच्यावर कडक कारवाई करण्याबाबत देखील भाष्य केले जात आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने शेअर बाजारात सांगितले की हा संप कायम राहिल्यास बँक शाखा आणि कार्यालयांमध्ये सामान्य कामकाजावर परिणाम होऊ शकतो.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: