Home /News /national /

जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये मोठी चकमक, दोन दहशतवाद्यांचा खात्मा तर CRPF जवान शहीद

जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये मोठी चकमक, दोन दहशतवाद्यांचा खात्मा तर CRPF जवान शहीद

आतापर्यंत या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत, तर एक भारतीय सैनिक शहीद झाला असल्याची माहिती समोर येत आहे.

    श्रीनगर, 23 जून : जम्मू-काश्मीरच्या (Jammu-Kashmir) पुलवामा (Pulwama) इथं मंगळवारी सकाळी पुन्हा एकदा भारतीय सुरक्षा दल (Indian security force) आणि दहशतवाद्यांध्ये चकमकी झाली आहे. आतापर्यंत या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत, तर एक भारतीय सैनिक शहीद झाला असल्याची माहिती समोर येत आहे. संपूर्ण परिसर भारतीय सुरक्षा दलाकडून घेरण्यात आला असून अद्यापही शोध मोहीम सुरू आहे. अनेक दहशतवादी अजूनही या भागात लपून बसल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुप्तहेरांकडून भारतीय सुरक्षा दलाला पुलवामाच्या बंडजू गावात काही दहशतवादी लपून बसले असल्याची आणि मोठ्या हल्ल्याचा कट रचत असल्याची माहिती हाती लागली होती. गुप्तचरांच्या आधारे सुरक्षा दलांनी स्थानिक पोलीस आणि सीआरपीएफ यांच्यासमवेत एक संयुक्त पथक तयार केलं आणि बंडजू गावाला घेरलं. गावात शोध मोहीम सुरू असतानाच घरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. कोरोनाचं पहिलं आयुर्वेदिक औषध कोरोनिल तयार, पतंजली आज जगासमोर आणणार गोळीबाराचा आवाज ऐकताच भारतीय सैनिकांनीही मोठ्या प्रमाणात फायरिंग सुरू केलं. दोन्ही बाजूंनी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. तर यामध्ये एक सीआरपीएफ जवान शहीद झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे. जखमी जवानला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, जिथे त्याला वीरमरण आल्याचं सांगण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमधील जडीबल भागात चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले होते. BREAKING : मानखुर्दमध्ये झोपडपट्टीत भंगाराला भीषण आग 17 दिवसांत 32 दहशतवादी झाले ठार सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 17 दिवसांमध्ये तब्बल 32 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तर यावर्षी सुरक्षा दलांनी काश्मीरमध्ये 107 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. भारतीय सुरक्षा दलांनी दक्षिण काश्मीरमध्ये 125 पेक्षाही अधिक दहशतवाद्यांना ठार मारण्याचा प्लान तयार केल्याचं वृत्त आहे. या दहशतवाद्यांमध्ये 25 परदेशीयांचाही समावेश आहे. धोका वाढला! माजी आरोग्य मंत्र्याला कोरोनाची लागण संपादन - रेणुका धायबर
    First published:

    Tags: Jammu and kashimir

    पुढील बातम्या