Home /News /national /

धोका वाढला! माजी आरोग्य मंत्र्याला कोरोनाची लागण

धोका वाढला! माजी आरोग्य मंत्र्याला कोरोनाची लागण

कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला असून राजकीय व्यक्तीही यापासून वाचू शकले नाहीत.

    अनिल पाटील, गोवा, 22 जून : दीड महिन्यापूर्वी ग्रीन झोन असणाऱ्या गोव्यात कोरोनाचा कहर वाढत आहे . या गेल्या दीड महिन्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 864 वर जाऊन पोहोचली असून यात आज 46 रुग्णांची भर पडली आहे. 864 पैकी 152 रुग्ण बरे झाले असून 711 रुग्ण ॲक्टिव्ह आहेत एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे . गोव्याच्या माजी आरोग्यमंत्र्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं आरोग्य तपासणीनंतर स्पष्ट झाले आहे. ॲक्टिव पॉझिटिव्ह रुग्णांवर मडगावच्या कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापैकी तीन रुग्ण गंभीर असल्याची माहिती ती समोर येत आहे. शाळांबाबत काय निर्णय होणार? गोव्यात कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन शाळा कॉलेज सुरू करण्याबाबतचा निर्णय गोवा सरकारने 15 जुलैपर्यंत पुढे ढकलला आहे .अर्थात यापूर्वी ऑनलाइन शिक्षण देण्यासाठी 11000 शिक्षकांना ट्रेनिंग देण्याचा निर्णय गोवा सरकारने घेतला आहे .मात्र ऑनलाइन शिक्षण ही सक्तीचं नसल्याचंही गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले. डॉक्टर सावंत पुढे म्हणाले, यावर्षीचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शाळांना अधिकच्या अवधीची गरज आहे. यासाठी गणेश उत्सव ,दिवाळी आणि ख्रिसमसच्या सुट्ट्या कमी करण्यात येणार आहेत. याबाबतचे अधिसूचना त्या-त्यावेळी प्रसिद्ध करण्यात येतील. गोव्यात कोरोना संसर्ग वाढत असला तरी गोवा सरकार विविध प्रकारच्या उपाययोजना करून तो रोखण्यासाठी विशेष प्रयत्न करत असल्याचं डॉ . सावंत म्हणाले आहेत.
    First published:

    Tags: Coronavirus, Goa

    पुढील बातम्या