नवी दिल्ली, 23 जून : कोरोनासारख्या जीवघेण्या साथीच्या रोगावर जगभरात उपचार करण्यासाठी असंख्य प्रयत्न सुरू आहेत, परंतु या दरम्यान बाबा रामदेव यांची संस्था पतंजली मंगळवारी कोरोनावर आधारित कोरोनाचं पहिलं आयुर्वेदिक औषधं 'कोरोनिल' जगासमोर आणणार आहे. कोरोनाशी लढा देणाऱ्यांसाठी ही बातमी कदाचित सर्वात उपयुक्त आहे. आचार्य बालकृष्ण हे आज दुपारी 12 वाजता हरिद्वारच्या पतंजली योगपीठात कोरोनाचं आयुर्वेदिक औषध 'कोरोनिल' लॉन्च करणार आहेत. बाबा रामदेवही यावेळी उपस्थित राहणार आहेत.
पतंजली योगपीठाने दावा केला होता की, त्यांना कोविड - 19 ला रोखण्याचे औषध सापडले आहे आणि ते प्रभावीदेखील ठरले आहे. कोविड - 19 विषाणूविरोधात प्रभावी औषध आणि लस शोधण्यासाठी जगभरात संशोधन सुरू आहे. भारतात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अनलॉक सुरू झाल्यामुळे कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. जर पतंजली योगपीठाचा दावा खरा ठरला तर देशातील लाखो लोकांना मोठी मदत मिळणार आहे. शिवाय अर्थव्यवस्थाही पुन्हा रुळावर येऊ शकेल.
Proud launch of first and foremost evidence-based ayurvedic medicine for #corona contagion, #SWASARI_VATI, #CORONIL, is scheduled for tomorrow at 12 noon from #Patanjali Yogpeeth Haridwar🙏🏻 pic.twitter.com/K7uU38Kuzl
— Acharya Balkrishna (@Ach_Balkrishna) June 22, 2020
यशस्वी प्रयोग
कोविड - 19 या विषाणूचे औषध बनविण्याचा दावा पतंजली योगपीठाचे सरचिटणीस आणि योग शिक्षक बाबा रामदेव यांचे सहयोगी आचार्य बाळकृष्ण यांनी केला आहे. आचार्य बालकृष्ण म्हणाले होते की, यावेळी कोरोना विषाणू भयावह स्थितीत आहे. कोरोना विषाणूचा शोध लागला तेव्हापासूनच पतंजली संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांच्या पथकाने त्याच्या औषधाचा शोध सुरू केला होता. ते म्हणाले की तुळस, अश्वगंधा तसेच अनेक प्रकारचे रस यांनी बनविलेले हे औषध हजारो कोरोना पॉझिटिव्ह लोकांवर वापरले गेले आहे. त्यांचा पाठपुरावा करण्यात आला असून ते सर्वजण बरे झाले आहेत.
जगासमोर करणार दावा
आचार्य बालकृष्ण म्हणाले होते की, आतापर्यंत पतंजली रिसर्च इन्स्टिट्यूटने त्यांच्या औषधाने बरे झालेल्या कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांचा डेटा तयार केला आहे. कोरोनामधील वेगवेगळ्या टप्प्यांचा आणि सर्व वयोगटातील लोकांचा डेटा आहे. यासह, शेकडो लोकांवर क्लिनिकल चाचण्या सुरु करण्यात आल्या आहेत
पतंजली संशोधन संस्था लवकरच जगातील प्रतिष्ठित विज्ञान जनरल मध्ये हा पेपर प्रकाशित करणार आहे. यासाठी तयारी सुरू केली आहे. वैद्यकीय विज्ञानात लोक जे काही पुरावे विचारतात त्यांना ते पुरवले जाणार आहेत.
संपादन - रेणुका धायबर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.