चंदीगड 17 जानेवारी : वर्कआउट करताना किंवा साधं काम करताना अचानक झालेल्या मृत्यूच्या घटना देशात वाढत आहेत. आता चंदीगडमधील डडू माजरा येथे पुन्हा असाच एक प्रकार समोर आला आहे. यात एका 33 वर्षीय तरुण बॉडीबिल्डरचा मृत्यू झाला आहे. राम राणा असं या तरुणाचं नाव आहे.
कुत्र्यापासून वाचला तरी जीव गेला, स्विगीच्या डिलिव्हरी बॉयसोबत घडलं भयानक, थरकाप उडवणारं CCTV
मिळालेल्या माहितीनुसार, राम राणा त्याच्या मित्रांसोबत उभा राहून त्यांच्याशी बोलत होता. यावेळी त्याने आपले दोन्ही खांदे मागे करण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान त्याचे दोन्ही हात मागे वळले आणि तो जमिनीवर पडला. हे पाहून त्याच्या मित्रांना वाटलं की तो स्ट्रेचिंग करत आहे. मात्र, जमिनीवर पडल्यानंतर तो अचानक शांत झाला आणि त्याने काहीच प्रतिक्रिया न दिल्याने मित्रांनी त्याला चंदीगडच्या सेक्टर 16 जीएमएच हॉस्पिटलमध्ये नेलं. जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
राम राणाच्या नातेवाइकांनी सांगितलं की, त्याला कोणताही आजार नव्हता. तो निरोगी होता आणि रोज जिममध्ये व्यायाम करत असे. त्याला कोणत्याही प्रकारचे वाईट व्यसन नव्हते. अंमली पदार्थांपासून दूर राहायचा आणि बाहेरचं अन्न खाणंही टाळायचा. राम राणा यांना दोन मुलं असून त्याचं वय 11 आणि 3 वर्षे आहे.
अशीच आणखी एक बाब समोर आली होती. यात गेल्या शनिवारी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेदरम्यान जालंधरचे काँग्रेस खासदार चौधरी संतोख सिंग (७६) हेही अचानक जमिनीवर पडले आणि त्यांचा मृत्यू झाला. तेही सुदृढ होते आणि त्यांना पूर्वी कोणत्याही आजाराची समस्या नव्हती.
विवाहित, 3 वर्षांचा मुलगा तरीही केली एक चूक; सुखी आयुष्याचं स्वप्न पाहणाऱ्या ममताचा धक्कादायक शेवट
चंदीगड पीजीआयचे एचओडी प्रो. संजय जैन म्हणतात की PGI प्रकरणांमध्ये, कार्डियाक ऍरिथमियाची शक्यता असते. म्हणजे हृदयाच्या गतीमध्ये अनियमितता किंवा हृदयविकाराचा झटका येणं. अनेक वेळा लवकर पोस्टमॉर्टम केल्यामुळे हृदयविकाराचा झटका आल्याचं समजत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Heart Attack, Shocking news