हैदराबाद,16 जानेवारी : हैदराबादमध्ये एका कुत्र्याने स्विगी डिलिव्हरी बॉयचा पाठलाग सुरू केला. यामुळे स्विगी डिलिव्हरी बॉयने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली आणि तीन दिवसांच्या प्रदीर्घ उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या अपघातानंतर लोकांनी त्याला तात्काळ रुग्णालयात नेले होते. मात्र, आज त्याचा उपचारादरम्यान, त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी कुत्र्याच्या मालक शोभनाविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण -
बंजारा हिल्स पोलीस स्टेशन हद्दीतील एका रुग्णालयात रिझवान नावाच्या स्विगी डिलिव्हरी बॉयचा मृत्यू झाला. डिलीवरीसाठी जात असताना त्याच्यावर पाळीव कुत्र्याने हल्ला केला. कुत्र्यापासून वाचण्याच्या प्रयत्नात तो इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली पडला. मोहम्मद रिजवान फक्त 23 वर्षांचा होता.
या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की, रिजवान जेवण देण्यासाठी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर पोहोचला तेव्हा त्याने ग्राहकाच्या घराचे गेट ठोठावले. ग्राहकाने गेट उघडताच त्याच्या जर्मन शेफर्ड कुत्र्याने डिलिव्हरी बॉय रिझवानवर हल्ला केला. तो चांगलाच घाबरला होता. डिलिव्हरी बॉय खाली पडल्याचे पाहताच फ्लॅट मालकाने अॅम्ब्युलन्स बोलावून त्याला रुग्णालयात नेले.
हेही वाचा - विवाहित, 3 वर्षांचा मुलगा तरीही केली एक चूक; सुखी आयुष्याचं स्वप्न पाहणाऱ्या ममताचा धक्कादायक शेवट
रुग्णालयात दाखल केले त्यावेळीच रिजवानची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले होते. यानंतर आज त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी बंजारा हिल्स पोलिसांनी कुत्र्याच्या मालक शोभनाविरुद्ध कलम 336 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलीस याप्रकणी पुढील तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.