जबलपूर, 28 मार्च: मध्य प्रदेशातील जबलपूर येथील GCF फॅक्टरीत भीषण ब्लास्ट होऊन एका जवान शहिद झाला आहे. या घटनेत तीन जवान गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले असून त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जबलपूर येथील GCFफॅक्टरीच्या आर्मी बेस वर्कशॉपमध्ये गन रिपेयर सेक्शनमध्ये नायट्रोजन गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. यात एका जवानाचा मृत्यू झाला असून तिघे गंभीर जखमी झाले आहेत. हेही वाचा.. बाटलीत पेट्रोल दिलं नाही, मग पठ्ठ्याने असं काही केलं की…,पाहा हा VIDEO
Army sources: One person dead and two injured after a blast during the overhauling of an artillery gun in an Army base workshop in Jabalpur (Madhya Pradesh).
— ANI (@ANI) March 28, 2020
स्फोटाची माहिती मिळताच फॅक्टरीचे जनरल मॅनेजर (जीएम) सह इतर वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. अग्निशमन दलाच्या एकूण 12 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. प्रशासकीय अधिकारीही फॅक्टरीत पोहोचले आहेत. रांझी एसडीएम मनीषा वास्कले यांनी सांगितलं की, फॅक्टरीच्या एफ 2 सेक्शनची बिल्डिंग 147 मध्ये स्फोट झाला आहे. आग विझवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं आहे. हेही वाचा.. गावात कोणी उपाशी राहू नये म्हणून ‘हा’ अवलिया अख्ख्या गावाला देत आहे मोफत किराणा दरम्यान, याआधी 19 मार्चला OFKमध्ये में भीषण घटना घडली होती. फॅक्टरीच्या सेक्शन एफ 2 च्या बिल्डिंग क्रमांक 147 मध्ये भीषण आग लागली होती. नंतर स्फोट झाला होता. या घटनेत संपूर्ण बिल्डिंग उद्ध्वस्त झाली होती. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. स्फोट झाला तेव्हा बिल्डिंगमध्ये एकही कर्मचारी नव्हता. 19 मार्चला लागली होती भीषण आग… ऑर्डनन्स फॅक्टरी खमरियाच्या एफ 2 सेक्शनच्या बिल्डिंग क्रमांक 147 मध्ये 19 मार्चला रात्री भीषण आग लागली होती. ही आग स्क्रेप बॉम्ब सेक्शनमध्ये ठेवलेल्या मॅग्झीन पावडरला लागली होती. नंतर ती संपूर्ण बिल्डिंगमध्ये पसरली होती.