मनमाड,28 मार्च : कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाउन करण्यात आलं आहे. महाराष्ट्रातही संचारबंदी करण्यात आली आहे. खबरदारीचे उपाय म्हणून पेट्रोल पंपावर बाटलीत पेट्रोल देण्यावर बंदी घालण्यात आली आहे. परंतु, मनमाडमध्ये एक तरुणाने असा काय प्रकार केला की, ते पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी दुचाकी,चारचाकी वाहनं येतात. मात्र, चक्क बैलगाडी पेट्रोल घेण्यासाठी आली असे म्हटल्यास त्याच्यावर सहजासहजी तुमचा विश्वास बसणार नाही मात्र असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
बाटलीत पेट्रोल देत नाही, बैलगाडीतच आणली दुचाकी... वारे गावचा जुगाड ! #cmomaharashtra #IndiaFightsCorona pic.twitter.com/j7g8kU5iH1
— sachin salve (@salve_salve7) March 28, 2020
पोलिसांच्या आदेशानंतर पंपावर बाटलीत पेट्रोल देणे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे मोटारसायकलचे पेट्रोल संपल्यानंतर या पठ्ठ्याने मोटारसायकल बैलगाडीत ठेवून थेट बैलगाडी पंपावर आणली. या तरुणाने थेट बैलगाडीत मोटारसायकल आणल्यामुळे पेट्रोलपंपावरील कर्मचारीही अवाक् झाले. आता याला बाटलीत पेट्रोल तर नियमानुसार देता येत नाही. पण, याने मोटारसायकल आणण्याची अट तर पूर्ण केली आहे. त्यामुळे बैलगाडीत जरी मोटारसायकल आणली असेल तरी त्याला पेट्रोल द्यावेच लागणार आहे. अखेर पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी या तरुणाच्या आयडियाच्या कल्पनेला मान्य करत मोटारसायकलमध्ये पेट्रोल भरून दिलं आहे. पेट्रोल पंपावर बैलगाडी आणून मोटरसायकलमध्ये पेट्रोल भरतानाचा हा व्हिडिओ आता मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. चक्क दुधाच्या टँकरमधून लोकं गावाकडे चालले कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन करण्यात आलं आहे. परंतु, आज चौथ्या दिवशी लोकांचा संयम सुटत चालला आहे. शहरात अडकून पडलेली परराज्यातील लोकं पायी किंवा मिळेल त्या वाहनाने गावी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. संचारबंदी असल्याने आता दुधाच्या टँकरमध्ये नक्की दूध आहे की माणसं याकडे पोलीस लक्ष ठेवून आहेत. कारण देखील तसंच असून दुधाच्या टँकरमधून चक्क कामगारांना गावी घेवून जात असल्याचा प्रकार तलासरीत उघड झाला आहे.
#lockdown च्या चौथ्या दिवशी हातावर पोट असणाऱ्या लोकांचं संयम सुटला, जीवाची परवा न करता अशा प्रकारे ही लोकं गावाकडे निघाली! #थांबा pic.twitter.com/DjzmGQoWXU
— sachin salve (@salve_salve7) March 28, 2020
कल्याणहून राजस्थानकडे दुधाच्या टँकमध्ये कामगारांना बसवून घेवून जात असताना तपासणी दरम्यान तलासरी पोलिसांनी कारवाई केली आहे. कोरोनासाठी सुरू असलेली संचारबंदीमुळे आपल्या गावाकडे जाण्यासाठी कामगार अनेक युक्त्या लढवत आहेत. कल्याणहून राजस्थानला जाण्यासाठी 12 कामगारांनी चक्क दुधाच्या टँकरमधून प्रवास करताना पालघर जिल्ह्यात पोलिसांनी कामगार आणि टँकर चालकाला ताब्यात घेतलं आहे. कल्याणहून राजस्थानकडे जाण्यासाठी निघालेले वाहन तलासरी पोलिसांनी तपासणीसाठी थांबवले होते.