जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Mercedes ने केले 2 तुकडे; सायरस मिस्त्रींच्या अपघातानंतर आलिशान कारचा आणखी एक भयंकर VIDEO

Mercedes ने केले 2 तुकडे; सायरस मिस्त्रींच्या अपघातानंतर आलिशान कारचा आणखी एक भयंकर VIDEO

मर्सिडीज कारचा भीषण अपघात.

मर्सिडीज कारचा भीषण अपघात.

सायरस मिस्त्री यांच्या मर्सिडीज कार अपघातात मृत्यू झाला होता. या घटनेला महिना उलटला नाही तोच अशाच कारचा आणखी एक अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे.

  • -MIN READ Andhra Pradesh
  • Last Updated :

हैदराबाद, 26 सप्टेंबर : टाटा सन्सचे अध्यक्ष आणि शापूरजी पालोनजी समूहाचे एमडी सायरस मिस्त्री यांचं अपघाती निधन झालं. त्यांच्या मर्सिडीज या कारला अपघात झाला होता. या अपघातानंतर मर्सिडीजच्या हाय अँड लक्झरी कारच्या सेफ्टीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. मिस्त्री यांच्या अपघाताला महिना उलटत नाही तोच आणखी एका मर्सिडीज कारच्या अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे. बेन्झ कार आणि ट्रॅक्टरची धडक झाली आहे. हा अपघात इतका भीषण होता की कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे. तर ट्रॅक्टरचे दोन तुकडे झाले आहे. आंध्र प्रदेशच्या हैदराबादमधील ही धक्कादायक घटना आहे. चंद्रगिरी बायपास रोडवर हा अपघात झाला आहे. सुदैवाने कारमधील सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती मिळते आहे.

जाहिरात

मर्सिडीज ही सर्वात सुरक्षित कार समजली जाते. या गाडीला ग्लोबल NCAP टेस्टमध्ये 5 स्टार सेफ्टी रेटिंग देण्यात आलं आहे. तसंच कंपनीने त्यांच्या सगळ्या कार योग्य टेस्टिंगनंतरच प्लांटमधून बाहेर काढल्या जातात, असा दावा केला आहे. महागडी आणि सुरक्षित समजली कारही कशी ठरते असुरक्षित? अत्यंत सुरक्षित मानली जाणारी मर्सिडीज जीएलएस या कारमध्ये सायरस मिस्त्रींचा मृत्यू झाला. तेव्हा ते मागील सीटवर बसले होते, त्यांच्यासोबत बसलेले जहांगीर पांडोळे यांचाही मृत्यू झाला, तर समोर बसलेला प्रवासी आणि चालक जखमी झाले. दोघांनाही रुग्णालयात दाखल केल्यामुळं त्यांचे प्राण वाचले. रिपोर्ट्सनुसार, मिस्त्री आणि पांडोले दोघेही सीट बेल्ट न लावता मागील सीटवर बसले होते. हे वाचा - आकाशात उडता उडता एकमेकांत अडकली 2 विमानं आणि…, भयंकर दृश्य कॅमेऱ्यात कैद; Watch Video एअरबॅग आणि उच्च सुरक्षा रेटिंग असलेल्या सुरक्षित कारमध्ये मिस्त्री पाठीमागील सीटवर सीटबेल्ट न लावता बसले होते. अपघात गंभीर जखमी होऊन ते ठार झाले. दरम्यान सीट बेल्ट न लावता मागच्या सीटवर बसलेले लोक वाईटरित्या जखमी किंवा ठार झाल्याची ही पहिलीच घटना नाही. सीट बेल्ट न वापरणाऱ्या लोकांचा मृत्यू झाल्याची अनेक उदाहरणे-

  1. ऑगस्ट 1997 मध्ये, राजकुमारी डायना आणि तिचा जोडीदार डोडी अल-फयद यांचा पॅरिसमध्ये एका हाय-स्पीड कार अपघातात मृत्यू झाला. दोघेही मर्सिडीज S600 च्या मागच्या सीटवर होते. त्याचवेळी समोरील पॅसेंजर सीटवर बसलेला अंगरक्षक या घटनेतून बचावला.

  2. जून 2014 मध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांचा दिल्लीत कार अपघातात मृत्यू झाला होतात. ते मारुती सुझुकी SX4 च्या मागच्या सीटवर बसले होते. त्याचवेळी समोरच्या सीटवर बसलेला त्यांचा ड्रायव्हर आणि सेक्रेटरी बचावले.

हे वाचा -  धुक्यांमुळे त्यानं गाडीचा वेग कमी केला, पण मागून भरधाव कार आली आणि थेट गाडी हवेत उडाली, VIDEO VIRAL

  1. ऑक्टोबर 2012 मध्ये कॉमेडियन जसपाल भाटी यांचाही अशाच प्रकारे मृत्यू झाला होता. तो त्याच्या होंडा अॅकॉर्डमध्ये पंजाबमध्ये प्रवास करत होता. कार झाडावर आदळली तेव्हा तो सीट बेल्ट न लावता मागे बसला होता. कारमधील इतर तीन जण बचावले, ज्यात गाडी चालवणाऱ्या त्याच्या मुलाचाही समावेश आहे. मागील सीट बेल्ट न वापरल्यानं प्रवाशांना जीव गमवावा लागल्याची अनेक उदाहरणं आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात