बुलंदशहर, 26 सप्टेंबर : उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कालिंदी कुंजमध्ये शिक्षामित्र हरेंद्र शर्मा यांच्या हत्येचा खळबळजनक खुलासा पोलिसांनी केला आहे. ही हत्या दुसऱ्या कुणी नाही तर मृताच्या पत्नीने आपल्या प्रियकरासह केली. तिला आपल्या प्रियकरसोबत राहायचे होते आणि मृत हरेंद्र हा दोघांच्या प्रेमात अडथळा ठरत होता, त्यामुळे तिने हे भयानक पाऊल उचलले, अशी ही माहिती पोलिसांनी दिली. काय आहे संपूर्ण प्रकरण - जेव्हा या महिलेचा पती हा दारूच्या नशेत असताना त्याला विजेचा धक्का देऊन ठार मारण्यात आले. नेहा असे तिचे नाव आहे. नेहाने तिच्या सासऱ्यांना सांगितले होते की, हरेंद्रला जोरदार झटका आला होता, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. मात्र, कुटुंबीयांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी शेजारच्या परिसरात चौकशी केली. यावेळी मृत हरेंद्रची पत्नी नेहा आणि तिचा प्रियकर रवी यांनी मिळून हरेंद्रची हत्या केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी एसएसपी श्लोक कुमार यांनी सांगितले की, हरेंद्र यांचा मृत्यू झाला. यानंतर त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची माहिती त्यांच्या पत्नीने कुटुंबीयांना दिली. त्यानंतर अंत्यसंस्कारासाठी नेले जात होते. त्यानंतर घरच्यांना संशय आला. या संपूर्ण घटनेत संशय निर्माण झाला होता. त्याआधारे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
यानंतर पोलिसांची अनेक पथके स्थापन करण्यात आली ज्यात अनेकांची चौकशीही करण्यात आली. यानंतर मृताची पत्नी आणि तिच्या प्रियकराने हरेंद्रची हत्या केली असे तपासात उघड झाले आहे. आधी मृताला एक औषध दिले त्यामुळे तो बेशुद्ध झाला. त्यानंतर मृताला वायर लावून करंट देण्यात आला, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. हेही वाचा - सर्वपित्री अमावास्येच्या रात्री भोंदू मांत्रिकाचं तरूणींवर अघोरी कृत्य, घराचं दार उघडताच पोलीस हादरले! ही हत्या त्यांनी केली आहे, असे उघड होऊ नये म्हणून हरेंद्रचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे लोकांना सांगू लागले. मात्र, पोलिसांनी याप्रकरणी कसून चौकशी केली असता ही धक्कादायक माहिती समोर आली. यानंतर या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.