Home /News /national /

ब्रृजभूषण सिंह आणि संजय राऊत अयोध्येत आले एकाच घाटावर, पण भेट टाळली!

ब्रृजभूषण सिंह आणि संजय राऊत अयोध्येत आले एकाच घाटावर, पण भेट टाळली!

 अयोध्येतील शरयू नदीवरील नया घाटावर शिवसेना नेते संजय राऊत आले होते. पण त्यांनी भाजप खासदार ब्रृजभूषण सिंह यांना भेटण्याचं आणि त्यांच्या समोर जाण्याचं टाळलंय.

अयोध्येतील शरयू नदीवरील नया घाटावर शिवसेना नेते संजय राऊत आले होते. पण त्यांनी भाजप खासदार ब्रृजभूषण सिंह यांना भेटण्याचं आणि त्यांच्या समोर जाण्याचं टाळलंय.

अयोध्येतील शरयू नदीवरील नया घाटावर शिवसेना नेते संजय राऊत आले होते. पण त्यांनी भाजप खासदार ब्रृजभूषण सिंह यांना भेटण्याचं आणि त्यांच्या समोर जाण्याचं टाळलंय.

अयोध्या, 13 जून : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (mns leader raj thackery) यांच्या दौऱ्याला भाजपचे खासदार ब्रृजभूषण सिंह (brij bhushan singh) यांनी कडाडून विरोध केला होता. पण आता राज ठाकरे यांचे पुतणे आणि  शिवसेनेचे नेते व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे अयोध्याच्या दौऱ्यावर (aditya thackeray ayodhya visit) जाणार आहे. त्यांच्या या दौऱ्याच्या आधी शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि बृजभूषण सिंह एकाच घाटावर आले पण दोन्ही नेत्यांची भेट होऊ शकली नाही. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याआधी शिवसेनेचे खासदार संजय राऊत आपल्या कार्यकर्त्यांसह अयोध्येत दाखल झाले आहे.  अयोध्येतील शरयू नदीवरील नया घाटावर शिवसेना नेते संजय राऊत आले होते. पण त्यांनी भाजप खासदार ब्रृजभूषण सिंह यांना भेटण्याचं आणि त्यांच्या समोर जाण्याचं टाळलंय. शिवसेना नेते संजय राऊत नया घाट आरती स्थळापासून 50 मीटर अंतरावरून नया घाट परिसराची पाहणी करत आहेत. त्यामुळे यावेळी दोन्ही खासदारांची भेट होऊ शकली नाही. दरम्यान,आदित्य ठाकरे 15 जून रोजी अयोध्येला जाणार आहेत. अयोध्येत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दौऱ्याला कडाडून विरोध करणारे भाजपचे खासदार ब्रृजभूषण यांनी मात्र आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याचे स्वागत केलंय. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याला आमचा विरोध नसल्याचं त्यांनी न्यूज १८ लोकमतशी बोलताना सांगितलंय. 'आदित्य ठाकरे अयोध्या दौऱ्याला येत आहे, मला याआधीही विचारलं होतं की, राज ठाकरे यांना विरोध केला होता तर आदित्य ठाकरेंना विरोध करणार का, तर माझं उत्तर असं आहे, माझा विरोध हा एका व्यक्तीला आहे. उत्तर भारतीय लोकांसोबत राज ठाकरे आणि त्यांच्या लोकांनी चांगला व्यवहार केला नाही. त्यांना चांगली वागणूक दिली नाही. त्यामुळे आमचा त्यांना विरोध आहे, महाराष्ट्रातील कोणत्याही व्यक्तीला आमचा विरोध नाही. आदित्य ठाकरे येत आहे, त्यांचं स्वागत आहे, असं ब्रृजभूषण सिंह म्हणाले. (कोरोना पसरतोय! Omicron च्या BA.4, BA.5 Variant चा मुंबईत शिरकाव, 4 रुग्ण आढळले) एवढंच नाहीतर, हनुमान गढीचे प्रबंधक असलेल्या व्यक्तीला आदित्य ठाकरे यांचं स्वागत करण्यासाठी सांगितलं आहे. आदित्य ठाकरे जेव्हा येतील तेव्हा त्यांचं जंगी स्वागत केलं जाईल, असंही बृजभुषण यांनी स्पष्ट केलं. 'आदित्य ठाकरे ज्या दिवशी अयोध्यात येत आहे, त्यादिवशी मी देशाच्या बाहेर आहे. त्यांना भेटायला आवडेल. पण मी आधीच दौरा निश्चित केला आहे. त्यामुळे भेटू शकणार नाही. आमचा विरोध फक्त हा राज ठाकरे यांना आहे, असंही सिंह यांनी ठणकावून सांगितलं. (वटपौर्णिमेला बायकोला उचलून घेणं यश,जयदीपला नडलं; नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर घेरलं) तसंच, आदित्य ठाकरे हे राज ठाकरे यांचे पुतणे जरी असले तरी ठाकरे कुटुंबाने आणि शिवसेनेनं कधीही उत्तर भारतीयांसोबत चुकीचा व्यवहार केला नाही. पण, मनसे आणि राज ठाकरे यांनी सर्व देशासमोर उत्तर भारतीयांना अपमानित केले आहे. अयोध्या ही सर्वांची आहे, हिंदूंची आहे, मराठा समाजाची आहे. सर्वांनी यावं, आदित्य ठाकरेंनी यावं, उद्धव ठाकरे यांनीही किंवा कुणीही यावं त्यांचं स्वागत आहे, असंही ब्रृजभूषण सिंह यांनी ठणकावून सांगितलं.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या