मुंबई, 13 जून: पाऊसाला सुरुवात झालीय आणि पावसात येणारा पहिला सण म्हणजे वटपौर्णिमा (Vat Purnima 2022) सण केवळ आपल्या घरीच साजरे होत नाहीत तर लाडक्या मालिकांमध्येही सणांना सुरुवात होते. आता मराठी टेलिव्हिजनवर सगळ्याच मालिकांमध्ये वटपौर्णिमा साजरी केली जाणार आहे. प्रत्येक मालिकेत मालिकेच्या कथानकानुसार वटपौर्णिमेचा भाग शुट करण्यात आला आहे. स्टार प्रवाहवरील (Star Pravah) सर्वच मालिकांमधील नायिका त्यांची पहिली वटपौर्णिमा साजरी करणार आहेत. तर झी मराठीवर (Zee Marathi) नुकतचं लग्न झालेली नेहा ( Neha) तिची तिची पहिली वटपौर्णिमा साजरी करणार आहे. नेहाची वटपौर्णिमा काही हटके स्टाइलनं होणार आहे. यश नेहाला उचलून घेऊन वडाला फेरे मारणार आहे. तर इकडे जयदीपही गौरीला (Jaydeep Gauri) उचलून घेऊन वडाला फेरे मारणार आहे. दोघांचा हा रोमँटिक अंदाज पाहायला प्रेक्षकांना फारच आवडत आहे. पण असं असलं तरी यश आणि जयदीपला आपल्या बायकांना उचलून घेणे चांगलच नडलं आहे कारण दोन्ही मालिकांना ट्रोल करत नेटकऱ्यांनी चांगलंच घेरलं आहे. माझी तुझी रेशीमगाठ (Majhi Tujhi Reshimgath) आणि सुख म्हणजे नक्की काय असतं (sukh mhanje nakki kay asta) मालिकेचा वटपौर्णिमा विशेष भाग उद्या प्रदर्शित होणार आहे. त्याआधी मालिकेतील विशेष भागाचे प्रोमो समोर आलेत. प्रोमोमध्ये दोन्ही मालिकांनी एकमेकांची कॉपी केलीय असं दिसून आलं आहे. नेटकऱ्यांनी दोन्ही मालिकांना ट्रोल करत भन्नाट कमेंट्सचा वर्षाव केलाय.
सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत वटपौर्णिमेच्या पवित्र दिवशी मानसी अनिलचा पर्दाफाश करुन जयदीप आणि गौरी एकत्र येणार आहेत. या खास क्षणी जयदीप गौरीला रोमँटिक होत उचलून घेतो आणि वडाला फेरे मारत पूजा पूर्ण करतो. मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षकांनी हा रोमँटिक सीन पाहण्यासाठी फारच उत्सुकता दाखवली. हेही वाचा - ZEE Marathiचा जाहीर माफीनामा ! माझी तुझी रेशीमगाठच्या विवाह विशेष भागात व्यत्यय; आज पुन्हा दाखवणार एपिसोड तर दुसरीकडे नुकतच लग्न झालेल्या यशने देखील रोमँटिक होत नेहाला उचलून घेत वडाला फेरे मारले. हे पाहून प्रेक्षक फार हैराण झालेत. ‘अरे चाललंय काय? मालिका एकमेकांची कॉपी करतात का?’ असा प्रश्न त्यांनी केला आहे.
दोन्ही मालिकेचे वटपौर्णिमा विशेष भाग पाहून नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्यात, एक युझरनं म्हटलंय, ‘नेहा यशने गौरी जयदीपची कॉपी केली’य, तर दुसऱ्या युझर्सनी, ‘आणखी कोण कोण आपल्या बायकांना उचलून घेऊन वडाला फेरे मारणार हे पण सांगा’, असं म्हटलंय. दोन्ही मालिकांचे वटपौर्णिमा विशेष भाग काय रंगत आणणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल कारण दोन्ही मालिकांमध्ये नवी सुरुवात पाहायला मिळणार आहे.