जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / कोरोना हातपाय पसरतोय! Omicron च्या BA.4, BA.5 Variant चा मुंबईत शिरकाव, 4 रुग्ण आढळले

कोरोना हातपाय पसरतोय! Omicron च्या BA.4, BA.5 Variant चा मुंबईत शिरकाव, 4 रुग्ण आढळले


राज्यात कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढत आहे. अशातच राज्यात बी.ए. 4 चे 3 आणि बी.ए. 5 व्हेरीयंटचा एक रुग्ण आढळला आहे.

राज्यात कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढत आहे. अशातच राज्यात बी.ए. 4 चे 3 आणि बी.ए. 5 व्हेरीयंटचा एक रुग्ण आढळला आहे.

राज्यात कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढत आहे. अशातच राज्यात बी.ए. 4 चे 3 आणि बी.ए. 5 व्हेरीयंटचा एक रुग्ण आढळला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 13 जून : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाची (maharashtra corona cases) चौथी लाट आल्याची भीती वर्तवली जात आहे  कोरोना प्रकरणं वाढत असताना आता झोप उडवणारी आणखी एक बातमी समोर आली आहे. राज्यात ओमिक्रॉनच्या बीए सबव्हेरिएंटने शिरकाव केला आहे. BA.4, BA.5 व्हेरिएंट घुसला आहे. (cases of omicron subvariants BA.4, BA.5 ) राज्यात BA.4चे 3 आणि बी.ए. 5 चा एक रुग्ण आढळला आहे. राज्यात कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढत आहे. अशातच राज्यात बी.ए. 4 चे 3 आणि बी.ए. 5 व्हेरीयंटचा एक रुग्ण आढळला आहे. मुंबई येथील कस्तुरबा रुग्णालय प्रयोगशाळेच्या ताज्या अहवालानुसार मुंबईत बी. ए. ४ चे 3 आणि बी ए. ५ व्हेरीयंटचा एक रुग्ण आढळून आला आहे. हे सर्व रुग्ण १४ मे ते २४ मे २०२२ या कालावधीतील आहे. त्यातील दोन 11 वर्षांच्या मुली तर दोन ४० ते ६० वर्षे वयोगटातील पुरुष आहेत. हे सर्व रुग्ण घरगुती विलगीकरणात बरे झाले असून या सर्व रुग्णांचे इतर तपशील देखील घेण्यात येत आहेत. तर दुसरीकडे, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे.  आज राज्यात 1885 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.  तसंच, राज्यात आज एका कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८६ टक्के एवढा आहे. ( ENG vs NZ : अंडरसनने इतिहास घडवला, हा वर्ल्ड रेकॉर्ड करणारा पहिलाच ) तर, आज ७७४ रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ७७,४७,१११ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.९१% एवढे झाले आहे. तर राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही १७४८० इतकी आहेत. पुण्यातही सापडले होते BA.4, BA.5 व्हेरिएंट रुग्ण दरम्यान, 28 मे रोजी,  राज्यात ओमिक्रॉनच्या बीए सबव्हेरिएंटने शिरकाव केला. BA.4, BA.5 व्हेरिएंट घुसला आहे. पहिल्यांदाच राज्यात या व्हेरिएंटच्या रुग्णांची नोंद पुण्यात झाली होती. सर्व सात रुग्ण पुण्यात आढळून आले होते.  BA.4 चे 4 आणि BA.5 चे 3 रुग्ण आहेत. हे सातही रुग्ण पुण्यात आढळल्याची माहिती सरकारने दिली. पुण्याच्या बी.जे मेडिकल कॉलेजमध्ये या रुग्णांच्या नमुन्यांचं जीनोम सिक्वेसिंग झालं. सात रुग्णांपैकी 4 रुग्ण पुरुष आणि 3 महिला होत्या. 5 रुग्णांचं वय 50 पेक्षा जास्त होते. 2 रुग्ण 20 ते 40 वयोगटातील होते. तर एक रुग्ण 10 वर्षांपेक्षा लहान वयाचा होता. याआधी भारतात हैदराबाद या व्हेरिएंटचा देशातील पहिला रुग्ण सापडला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात