Kanpur News : कानपूरमध्ये मोठा अपघात, ट्रक उलटून 22 मजूर अडकले, 6 ठार

Kanpur News : कानपूरमध्ये मोठा अपघात, ट्रक उलटून 22 मजूर अडकले, 6 ठार

गाणी ऐकण्याच्या नादात चालक बेफामपणे गाडी चालवत होता. त्यामुळे ट्रक उलटला.

  • Share this:

कानपूर, 02 मार्च : उत्तर प्रदेशमधील कानपूर जिल्ह्यात (Kanpur District) भरधाव ट्रक उलटून भीषण अपघात घडला आहे. या अपघातात 6 जणांचा दुर्दैवी मृ्त्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहे.  जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कानपूर येथील भोगनीपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा अपघात घडला आहे. मजुरांना घेऊन एक ट्रॅक जात होता. हायवेवर अचानक चालकाचे नियंत्रण सुटले आणि हा ट्रक उलटला. या ट्रकमध्ये 22 मजूर प्रवास करत होते. ट्रक उलटल्यामुळे 22 मजूर खाली अडकले गेले, यात 6 जणांचा मृ्त्यू झाला. तर इतर 16 मजूर जखमी झाले आहे. यात 8 जण हे गंभीर जखमी झाले आहे. यात एका मजुराची प्रकृती ही नाजूक असल्याचे सांगितले जात आहे. इतर आठ जणांची किरकोळ जखमा झाल्या आहे, त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून सुटका करण्यात आली आहे.

अपघात घडल्यानंतर स्थानिकांनी तातडीने धाव घेऊन मजुरांना बाहेर काढण्यासाठी मदत केली. रस्त्याने ये जा करणाऱ्या वाहनचालकांनीही वाहनं थांबवून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यास मदत केली.

जखमी मजुराने दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व मजूर हमीरपूर जिल्ह्यातील रहिवासी होते. हमीरपूर येथून हे सर्व मजूर इटावा इथं जात होते. या मजुरांना कोळशाच्या खाणीमध्ये काम मिळाले होते. ट्रकचालक मोठ्या आवाजात गाणी लावून सुसाट ट्रक चालवत होता. गाणी ऐकण्याच्या नादात चालक बेफामपणे गाडी चालवत होता. त्यामुळे ट्रक उलटला. या अपघातात लहान मुलांचा सुद्धा समावेश आहे.

घटनेची माहिती मिळताच भोगनीपूर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी मजुरांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे, काही जखमींची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना कानपूरच्या जिल्ह्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Published by: sachin Salve
First published: March 2, 2021, 8:41 AM IST

ताज्या बातम्या