मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /सकाळी बेडवरून उठावंसं वाटत नाही? या आहेत आळस घालवण्याच्या सोप्या ट्रिक्स

सकाळी बेडवरून उठावंसं वाटत नाही? या आहेत आळस घालवण्याच्या सोप्या ट्रिक्स

सकाळी लवकर उठणं आरोग्यासाठी खूप चांगलं असतं. पण हे सगळ्यांनाच शक्य होत नाही.

सकाळी लवकर उठणं आरोग्यासाठी खूप चांगलं असतं. पण हे सगळ्यांनाच शक्य होत नाही.

सकाळी लवकर उठणं आरोग्यासाठी खूप चांगलं असतं. पण हे सगळ्यांनाच शक्य होत नाही.

मुंबई, 2 मार्च : रोज रात्री तुम्ही हा विचार करून झोपत असाल, की उद्या सकाळी काहीही झालं तरी लवकर उठायचं आहे. मात्र सकाळी तुम्हाला अजिबातच जाग येत नाही. चित्र असं असेल तर ही तुमची एकट्याची समस्या नाही. (problems in getting up early)

अनेक लोकांना हा प्रश्न समस्या सतावते, की हमखास लवकर उठण्याची सवय स्वतःला कशी लावून घ्यायची? लवकर उठण्याचे फायदे असंख्य आहेत. व्यायाम करून, जिमला जाऊन आरोग्याची काळजी घेता येते. स्वतःला वेळ देता येतो. (benefits of waking up early in morning) वॉकिंगला जाता येतं. पण आळस झटकून आरामदायी अंथरूणावरून उठणं इतकंही सोपं नाही. (how to get up early in morning)

काही साध्यासोप्या प्रभावी टिप्स मात्र तुम्हाला या कामात यश देतील. जाणून घ्या या टिप्स. (tips to get up early in morning)

वेळेवर झोपणं आहे गरजेचं

तुम्ही रोज रात्री सोशल मीडियावर खूप वेळ घालवत असाल तर ही सवय आधी बंद करा. तुमचा खूप वेळ यात गरज नसताना वाया जातो. तुम्ही उशीरा झोपता तेव्हा सकाळी उठणं अवघड होऊन बसतं. कारण झोप पूर्ण झालेली नसते. पूर्ण झोप घ्या. आळस, थकवा येणार नाही आणि उठताही उत्साह वाटेल.

सोबती शोधा

सकाळी जिम किंवा वॉकिंगला जाण्यासाठी तुम्हाला सोबती मिळाला तर हे अधिक सोपं होईल. फिटनेस रुटीन यामुळं नीट सेट होईल. यातून तुम्ही अगदी वेळेवर जिमला जाऊ शकाल. एक सोबत मिळेल आणि शिस्तही लागेल. एकटं वॉकिंगला जाताना तुम्हाला कंटाळा येणार नाही.

वेळेवर डिनर करा

रात्रीचं जेवण वेळेवर केल्यास सकाळी उठणं सोपं होईल. असं नको व्हायला, की कधी वेळेवर तर कधी उशिरा जेवलात. एक वेळ ठरवून घ्या आणि तेव्हाच डिनर करा. यातून तब्येतही चांगली राहते. वेळेवर जेवण करा आणि रात्री झोपण्याआधी कमीतकमी दोन तास आधी जेवण करा. जेवल्यावर चहा किंवा कॉफी अजिबात घेऊ नका. यातून रात्री लवकर झोप येत नाही आणि सकाळी आळस येतो.

सशक्त मनोनिग्रह

सकाळी लवकर उठण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे, की तुम्ही मानसिक रूपानं तयार असलं पाहिजे. असं केल्यानं कुणी तुम्हाला उठवण्याची गरज पडणार नाही. वाढणारं वजन कमी करण्यासाठी तुम्ही रोज सकाळी लवकर उठून व्यायाम करण्याचा विचार करत असाल, तर तुमचा मनोनिग्रह पक्का असला पाहिजे. मनात हा पक्का निश्चय करा, की मला लवकर उठायचं आहे.

हेही वाचा तरुणीच्या जिद्दीला सलाम; पाय गमावलेली सोनम ठरली सर्वोत्कृष्ट डान्सर

अलार्मची घडी दूर ठेवा

अनेक लोक सकाळी लवकर उठण्यासाठी घडी किंवा मोबाईलमध्ये अलार्म लावतात. तुम्हीही त्यापैकी एक असाल, तर आपल्या अलार्मची घडी नेहमी बेडपासून थोडी दूर ठेवा. अलार्म वाजल्यावर तो बंद करण्यास तुम्ही उठाल तेव्हा तुमची झोप उडेल.

First published:

Tags: Health Tips