देश

  • Associate Partner
  • diwali-2020
  • diwali-2020
  • diwali-2020

'...तरच फटाक्यांशिवाय दिवाळी होणार', भाजप खासदाराची वादग्रस्त पोस्ट

'...तरच फटाक्यांशिवाय दिवाळी होणार', भाजप खासदाराची वादग्रस्त पोस्ट

सध्या दिल्ली, राजस्थान, ओडिशा, चंदीगड, कर्नाटक यांनी दिवाळीत फटाक्यांवर बंदी घातली आहे. दिवाळीत फटाक्यांच्या धुरामुळे श्वसनाला बाधा येऊ शकते.

  • Share this:

लखनऊ, 07 नोव्हेंबर : कोरोनामुळे यंदा दिवाळी साधेपणानं साजरी करावी, असे आवाहन प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जनतेला केले आहे. मात्र याचबरोबर दिल्ली, राजस्थान, ओडिशा, चंदीगड, कर्नाटक यांनी दिवाळीत फटाक्यांवर बंदी घातली आहे. दिवाळीत फटाक्यांच्या धुरामुळे श्वसनाला बाधा येऊ शकते. कोरोनाच्या आजारात श्वासोच्छवासाचा त्रास होतो, यामुळे राज्यांनी हा निर्णय घेतला आहे. मात्र निर्णयावर भारतीय जनता पक्षाचे उन्नाव खासदार साक्षी महाराज यांनी आक्षेप घेतला आहे. साक्षी महाराज यांनी फेसबुकवर बकरी ईदविषयी वादग्रस्त टिप्पणी केली आहे.

एकीकडे दिवाळीच्या फटाक्यांबाबत देशात असंतोष असताना खासदार साक्षी महाराज यांनी फेसबुक पेजवर एक वादग्रस्त पोस्ट केली आहे. फटाक्यांबाबत साक्षी महाराजांनी फेसबुकवर लिहिले आहे की, ज्यावर्षी बकऱ्याशिवाय बकरी ईद साजरी केली जाईल, तेव्हा फटाक्यांशिवाय दिवाळी साजरी होईल. फटाके न फोडण्याच्या राज्यांच्या निर्णयावर साक्षी महाराज यांनी फेसबुकवर जोरदार भाष्य केले आहे.

वाचा-प्रदूषणावर आळा घालणं आवश्यक! अधिक प्रदूषित परिसरात कोरोनामुळे मृत्यूही जास्त

वाचा-बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी बाबा राम रहीम पॅरोलवर तुरुंगाबाहेर

उन्नाव खासदार साक्षी महाराज हे नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतात. हे भाजपचे फायर ब्रँड नेता म्हणून मोजले जाते. सध्या साक्षी महाराज कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे दिल्लीच आयसोलेशनमध्ये आहेत. दरम्यान साक्षी महाराज यांनी केलेल्या पोस्टवर अनेकांनी टीकाही केली आहे.

वाचा-पतीच्या मृत्यूनंतर पार्थिवाजवळच सोडला पत्नीनं जीव, बॅंडबाजासह निघाली अंत्ययात्रा

महाराष्ट्रात फटाके फोडणे टाळावे असे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

महाराष्ट्र सरकारही दिवाळी फटाक्यांबाबत लवकरच निर्णय घेऊ शकतो. सध्या दिवाळीच्या 5 मार्गदर्शक सूचना राज्य सरकारने गृह विभागाने जारी केल्या आहेत. यानुसार दिवाळीत प्रदूषण होऊ नये ही बाब विचारात घेऊन फटाके फोडणे टाळावे त्याऐवजी दिव्यांची आरास करून दिवाळी साजरी करावी. तसेच, यंदा दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजन करू नये, करायचे असल्यास ऑनलाइन आणि सोशल मीडिया माध्यमातून कार्यक्रम करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: November 7, 2020, 12:47 PM IST

ताज्या बातम्या