चंदिगड, 07 नोव्हेंबर : बलात्कार आणि हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले हरियाणामधील डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहीम पॅरोलवर तुरुंगाबाहेर आल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार राम रहीमचा पॅरोल 24 ऑक्टोबरला मंजूर करण्यात आला होता. एक दिवसासाठी बाबा राम रहीम तुरुंगाबाहेर असणार आहे.
बलात्कार आणि खून प्रकरणात दोषी ठरल्यानंतर डेरा रोहतक तुरुंगात सध्या शिक्षा भोगत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राम रहीमला आपल्या आईला भेटण्यासाठी एक दिवसाची पॅरोल मिळाली आहे. राम रहीमच्या आईच्या गुरुगममधील रुग्णालयात दाखल केलं असून सध्या त्यांच्या. राम रहीमला फरार होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.
हे वाचा-मुंबईत सोन्याच्या बिस्कीटांचं आमिष दाखवून व्यापाऱ्याला 39 लाखांचा गंडा
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राम रहीम 24 ऑक्टोबरला संध्याकाळपर्यंत राम रहीम आईजवळ राहिला होता. हरियाणा पोलिसांची तीन तुकडी तैनात करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. हरियाणामधील काही वरिष्ठ अधिकारी यांना याची माहिती होती. यापूर्वीही रामरहीमला पगार देण्याची चर्चा उघडकीस आली होती. मात्र, सरकारने पॅरोल देण्यास नकार दिला. पण आता हरियाणा सरकारनं पॅरोल दिल्यानं सवाल उपस्थित होत आहे.