मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

हवेतील प्रदूषणावर वेळीच आळा घालणं आवश्यक! प्रमाण अधिक असणाऱ्या परिसरात कोरोनामुळे मृत्यूही जास्त

हवेतील प्रदूषणावर वेळीच आळा घालणं आवश्यक! प्रमाण अधिक असणाऱ्या परिसरात कोरोनामुळे मृत्यूही जास्त

हवेतील प्रदूषणाची पातळी जर अधिक असेल तर कोरोना (Coronavirus) बाधितांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

हवेतील प्रदूषणाची पातळी जर अधिक असेल तर कोरोना (Coronavirus) बाधितांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

हवेतील प्रदूषणाची पातळी जर अधिक असेल तर कोरोना (Coronavirus) बाधितांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

वॉशिंग्टन, 06 नोव्हेंबर: हवेतील प्रदूषणाची पातळी जास्त असलेल्या ठिकाणी राहणाऱ्या कोरोनाबाधितांच्या मृत्युचा धोका 11 टक्क्यांनी अधिक असल्याचे एका संशोधनात समोर आले आहे. अमेरिकेतील हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या (Harvard University) एका अभ्यासादरम्यान केलेल्या पाहणीतून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. अमेरिकेतील कोव्हिड-19चा डेटा यामध्ये तपासण्यात आला.  यामध्ये असे स्पष्ट केले आहे की, प्रदूषणाचा स्तर खालावलेल्या ठिकाणी मृत्यूचा धोका कमी आहे.

हार्वर्ड विद्यापीठाच्या या अभ्यासात हवेच्या 2.5 मायक्रोमीटर प्रदूषकाच्या हवेतील प्रमाणावर विशेष अभ्यास करण्यात आला. प्रामुख्याने वाहन वापरामुळे वाढणाऱ्या हवेच्या प्रदूषणासोबतच इतरही कारणांचा अभ्यास या गटाने केलाय. अभ्यासात असं दिसून आलंय की, पीएम2.5 या प्रदूषकाच्या प्रमाणात दर क्युबिक मीटरमागे 1 मायक्रोग्रॅमची जरी वाढ झाली तरी कोव्हिड19 च्या मृत्यूदरात 11 टक्क्यांनी वाढ होऊ शकते. डेली मेलमध्ये यासंबंधीची बातमी प्रसिद्ध झाली आहे.

(हे वाचा-Gold Price: या आठवड्यात पहिल्यांदा स्वस्त झालं सोनं,डॉलरमधील तेजीमुळे उतरले दर)

हार्वर्ड विद्यापीठाच्या संशोधकांनी हा अभ्यास करताना जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीकडे असलेल्या कोव्हिड-19 (COVID-19) च्या डेटाचा आधार घेतला आहे. तसेच प्रदूषणाचा तपशील कॉम्प्युटर मॉडेल्स आणि वातावरणीय डेटाच्या साहाय्याने जमवण्यात आल्याचे यात म्हटले आहे. अमेरिकीतील 3,089 काउंटींमधून डेटा गोळा केला असल्याने सुमारे 98 टक्के अमेरिकन लोकांचा अभ्यास करण्यात आला असं अहवालात म्हटले आहे. अमेरिकेतील प्रदूषणाच्या हॉटस्पॉटमध्ये कमालीची तफावत आढळून आली. काही शहरांमध्ये अजिबातच प्रदूषण नव्हतं, तर काही मोठ्या शहरांमध्ये दर क्यूबिक मीटरमागे 12 मायक्रोग्रॅम्स एवढा प्रदूषकांचा स्तर वाढलेला दिसून आलाय.

(हे वाचा-PM Kisan: 25 दिवसानंतर तुमच्या खात्यात येणार 2000 रुपये, असा तपासा तुमचा रेकॉर्ड)

संशोधकांनी असा अंदाज बांधला आहे की, हवेतील PM2.5 कणांचं वाढलेले प्रमाण  Alveolar Angiotensin-converting Enzyme 2 (ACE-2) रिसिप्टरची तीव्रता वाढवतं. त्यामुळे प्रतिकारशक्तीवर परिणाम होतो. मानवी पेशींमध्ये आढळणाऱ्या ACE-2 रिसिप्टरमध्ये कोरोना विषाणू सहजपणे शिरकाव करतो. रिसिप्टरमार्फत पेशीपर्यंतचा मार्ग खुला करून घेतला की मग व्हायरस शरीराच्या प्रतिकार यंत्रणेत घुसखोरी करतो. घटलेल्या ACE-2 पेशींमध्ये कोव्हिड 19चा गंभीर परिणाम आढळून येतो, असे संशोधकांचे म्हणणे आहे.  यामुळे प्रसंगी मृत्यूदेखील ओढवू शकतो.

हार्वर्ड विद्यापीठाच्या या संशोधनावर मत मांडताना एडिनबर्ग विद्यापीठाचे मार्क मिलर यांनी गंभीर इशारा दिला आहे. या संशोधनात एडिनबर्ग सहभागी नव्हते, परंतु ते म्हणतात की, प्रदूषणाच्या वाढत्या प्रमाणामुळे ब्रिटनमध्ये किंवा जगात इतरत्र कुठेही ही अशी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

First published: