मराठी बातम्या /बातम्या /देश /

खरं प्रेम! पतीच्या मृत्यूनंतर पार्थिवाजवळच सोडला पत्नीनं जीव, बॅंडबाजासह निघाली अंत्ययात्रा

खरं प्रेम! पतीच्या मृत्यूनंतर पार्थिवाजवळच सोडला पत्नीनं जीव, बॅंडबाजासह निघाली अंत्ययात्रा

पतीचं पार्थिव पाहून अंगूरी देवी कोसळल्या आणि पतीच्या पायाजवळच बसून राहिल्या. त्यांच्या कुटुंबियांना अंगूरी देवा यांना सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र अंगूरी देव अचानक बेशुद्ध पडल्या.

    ग्वालिअर, 07 नोव्हेंबर : उत्तर भारतीय कुटुंब आणि एकंदरच संस्कृतीमध्ये करवा चौथचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. पतीच्या दीर्घायुष्यासाठी पत्नी उपवास करतात. मात्र ग्वालिअरमध्ये करवा चौथच्या दिवशीच भयंकर घटना घडली. सात जन्माचा वचन देणाऱ्या पती-पत्नीचा एकाच दिवशी मृत्यू झाला. करवा चौथच्या दिवशी 55 वर्षीय कमल गर्ग यांचा अपघात झाला, दुसऱ्याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अंत्यसंस्कारादिवशीच पत्नीनेही जीव सोडला. ग्वालिअरमधील रहिवासी किशोर गर्ग 4 नोव्हेंबर रोजी आपल्या बाईकवरून घरी परतत असताना त्यांना अपघात झाला. गंभीर स्वरूपात दुखापत झालेल्या कमल किशोर यांना लगेचच रुग्णालयात दाखल केले. मात्र गंभीर दुखापतीमुळे त्यांचा 5 नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला. मात्र, ज्यावेळी किशोर यांचे पार्थिव अंत्यसंस्काराठी घेऊन जाण्यात आले, त्याचवेळी एक धक्कादायक प्रकार घडला. वाचा-लॉकडाऊनमुळे कॅनडाचा व्हिसा झाला रद्द, बंदूक घेऊन मंदिरात गेला अन् गाभाऱ्यातच... किशोर यांची पत्नी अंगूरी देवी पतीच्या निधनामुळे धक्क्यात होत्या. कुटुंबियांनी पतीचं अंतिम दर्शन घेण्यासाठी अंगूरी देवी यांना घेऊन आले. मात्र पतीचं पार्थिव पाहून अंगूरी देवी कोसळल्या आणि पतीच्या पायाजवळच बसून राहिल्या. त्यांच्या कुटुंबियांना अंगूरी देवा यांना सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र अंगूरी देव अचानक बेशुद्ध पडल्या. लगेचच कुटुंबियांनी डॉक्टरांना बोलवलं, मात्र अंगूरी देवा यांचा जागीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. किशोर यांच्या मृत्यूनंतरही अंगूरी देवा यांनी त्यांची साथ सोडली नाही. कुटुंबियांनी एकाच वेळा दोघांवरही अंत्यसंस्कार केले. वाचा-बाल्कनीतून खाली पाहाताना तोल गेला आणि 14 व्या मजल्यावरून चिमुकला खाली कोसळला एकाच घरातून निघाल्या दोन अंत्ययात्रा अंगूरी आणि कमल किशोर यांच्या लग्नाला 55 वर्ष झाले होते. त्यांच्या पश्चात तीन मुलं आणि दोन मुली आहेत. सगळ्यांची लग्न झाली आहेत. कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांमध्ये अतुट प्रेम होते. दोघंही एकमेकांशिवाय कधीच राहिले नाही. कमल किशोर यांच्या मुलांनी आपल्या आई-वडिलांचे प्रेम साजरे करण्यासाठी बॅडबाजासह त्यांनी अंतिम यात्रा काढली.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या