मराठी बातम्या /बातम्या /देश /'The Kashmir Files चित्रपट एक धडा...'; भाजपचे हे आमदार नागरिकांना वाटणार सिनेमाची मोफत तिकिटं

'The Kashmir Files चित्रपट एक धडा...'; भाजपचे हे आमदार नागरिकांना वाटणार सिनेमाची मोफत तिकिटं

The Kashmir Files

The Kashmir Files

जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा चित्रपट पोहोचावा यासाठी कर्नाटकातील (Karnataka) भाजपच्या एका आमदाराने (BJP MLA) चक्क नागरिकांच्या तिकिटांचा खर्च (Ticket) उचलण्याची घोषणा केली आहे.

  नवी दिल्ली 16 मार्च : सध्या देशभरात सगळीकडे चर्चा आहे ती 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) या चित्रपटाची. विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित या चित्रपटात 1990 मध्ये काश्मीरमध्ये झालेलं काश्मिरी पंडितांचं हत्याकांड, त्यांच्यावरील अत्याचार आणि त्यांच्या विस्थापनाची कथा दाखवण्यात आली आहे. 11 मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला देशभरातून उदंड प्रतिसाद मिळत आहे. यावरून काही ठिकाणी वादंगही निर्माण झाला आहे. दैनिक जागरणनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

  पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीही या चित्रपटाचं कौतुक केलं असून, अनेक सेलिब्रिटींनीही या चित्रपटाची प्रशंसा केली आहे. हा चित्रपट करमुक्त करावा अशी मागणी अनेक राज्यात करण्यात येत आहे. काही ठिकाणी ती पूर्णही झाली आहे. अनेक ठिकाणी याचे खास शोज आयोजित केले जात आहेत. जास्तीतजास्त लोकांपर्यंत हा चित्रपट पोहोचावा यासाठी कर्नाटकातील (Karnataka) भाजपच्या एका आमदाराने (BJP MLA) चक्क नागरिकांच्या तिकिटांचा खर्च (Ticket) उचलण्याची घोषणा केली आहे.

  The Kashmir Files मध्ये चिन्मय मांडलेकरने साकारलेला बिट्टा कराटे नेमका आहे कोण?

  कर्नाटकातील विजयपुरा (Vijaypura) इथले आमदार बसनगौडा पाटील (Basangauda Patil) यांनी ही घोषणा केली आहे. त्यांनी आपल्या शहरातील सर्व चित्रपटगृह मालकांना आठवड्यातून किमान एक शो विनामूल्य दाखवण्यास सांगितलं असून, त्याचे सर्व पैसे स्वतः देणार असल्याचं जाहीर केलं आहे. पुढील आठवड्यात हा चित्रपट विजयपुरा इथं येणार आहे.

  'डेक्कन हेराल्ड' या इंग्रजी वेबसाइटच्या वृत्तानुसार, ''द कश्मीर फाइल्स' हा चित्रपट दाखवण्याचा उद्देश लोकांना जागृत करणं हा आहे. त्यांच्यासोबत अशी घटना पुन्हा घडू नये,' असं बसनगौडा पाटील यांनी म्हटलं आहे.

  Kashmir Filesसिनेमातले संवाद म्यूट केल्याबद्दल पहिल्यांदाच बोलला चिन्मय मांडलेकर

  'या चित्रपटात काश्मिरी पंडित आणि हिंदूंवर झालेले अत्याचार दाखवण्यात आले आहेत. माझ्या जिल्ह्यातील सगळ्या जनतेने ते पाहावे. आपल्या पुढच्या पिढीसाठी हा एक धडा आहे. आता यापुढे अशी कोणतीही घटना आपल्यासोबत घडू नये, यासाठी लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी हा चित्रपट जास्तीतजास्त लोकांना दाखवण्याची गरज आहे,' असं बसनगौडा पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

  'द काश्मीर फाइल्स' हा चित्रपट आपल्या शहरातील बहुतांश भागात प्रदर्शित करण्याची मागणीही पाटील यांनी केली आहे.

  सध्या देशात अनेक ठिकाणी हा चित्रपट प्रदर्शित झाला असून, सर्वत्र हाउसफुल होत आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने जोरदार कमाई केली आहे. या चित्रपटात अनुपम खेर, पल्लवी जोशी आणि मिथुन चक्रवर्ती, चिन्मय मांडलेकर यांच्यासह अनेक कलाकार आहेत.

  First published:

  Tags: Anupam kher, Jammu kashmir, Karnataka, Movie release