जाहिरात
मराठी बातम्या / देश / भाजपचं धक्कातंत्र; पुढीलवर्षी होणाऱ्या निवडणुकांत 15 ते 20 टक्के विद्यमान आमदारांचं तिकीट कापणार?

भाजपचं धक्कातंत्र; पुढीलवर्षी होणाऱ्या निवडणुकांत 15 ते 20 टक्के विद्यमान आमदारांचं तिकीट कापणार?

भाजपचं धक्कातंत्र; पुढीलवर्षी होणाऱ्या निवडणुकांत 15 ते 20 टक्के विद्यमान आमदारांचं तिकीट कापणार?

पुढीलवर्षी देशभरातील सात राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी भाजपने आपली रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 22 सप्टेंबर : गुजरात (Gujarat) आणि उत्तराखंड **(Uttarakhand)**मध्ये मुख्यमंत्री बदलल्यानंतर आता पुढील वर्षी राज्यातील सात राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजप (BJP) पुन्हा एक धक्कातंत्राचा अवलंब करणार असल्याचं वृत्त समोर येत आहे. रिपोर्ट्सनुसार, 2022 मध्ये देशातील विविध राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमध्ये भाजप 15 ते 20 टक्के विद्यमान आमदारांचे तिकीट कापण्याची शक्यता आहे. तीन राज्यांत मुख्यमंत्री बदलल्यानंतर आता भाजपचं नवं धक्कातंत्र पहायला मिळण्याची शक्यता आहे. पक्षाच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले की, गेल्या विधानससभा निवडणुकीत पक्षाने 15 ते 20 टक्के आमदारांना तिकीट न देण्याचा निर्णय घेतला होता. पण आता हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण, प्रशासनाच्या अनेक मुद्द्यांवरुन जनतेच्या अनेक समस्यांची चिंता आहे. 2022 मध्ये पंजाब, मणिपूर, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, गोवा, गुजरात आणि हिमाचलप्रदेशमध्य़े विधानसभा निवडणुका होणार आहेत. गुजरात प्रगतीच्या मार्गावर पुढे जात होते मग रातोरात मुख्यमंत्री बदलाची वेळ का आली? शिवसेनेचा रोखठोक सवाल अनेक राज्यांत भाजपबाबत नागरिकांमध्ये काय प्रतिक्रिया आहेत याची माहिती मिळवण्यासाठी एक ग्राऊंड सर्वेक्षण केले जाणार आहे. आमदारांनी गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामांचा अहवाल तयार करण्यास सांगण्यात आले होते. अशा परिस्थिती ज्या आमदारांची कामगिरी चांगली असेल त्यांनाच पुन्हा तिकीट दिले जाणार आहे. तर ज्यांची कामगिरी चांगली नसेल त्यांचे तिकीट कापले जाणार आहे. भाजपच्या एका कार्यकर्त्याने नाव न छापण्याच्या अटीवर माहिती शेअर केली आहे. आमदारांनी आपल्या मतदारसंघात खर्च केलेला विकास निधी, नागरिकांच्या मदतीसाठी तसेच मतदारसंघात करण्यात आलेले प्रकल्प, कोविड काळात करण्यात आलेल्या कामाच्या आधारावर आमदारांचे मूल्यांकन केले जाणार आहे. हे सर्वेक्षण सर्व मतदारसंघात करण्यात येत आहे जेथे सरकारच्या कामगिरीवर नागरिकांच्या प्रतिक्रिया मागितल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार, अमित शहांसोबत होणार बैठक? कार्यकर्त्याने पुढे सांगतले की, कोविड-19 महामारी एक मोठं आव्हन घेऊन आली. सरकारने आरोग्य सुविधा सुधारणे, लसीकरण सुनिश्चित करणे आणि वैद्यकीय पुरवठा वाढवून आपले काम केले आहे. तर पक्षानेही मदत कार्य केले आहे. पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी प्रत्येक गरजूंना अन्न पुरवठा करण्यासाठी, नोकरी गमावलेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी आणि त्यांच्या बूथमध्ये 100 टक्के लसीकरण सुनिश्चत करण्यास सांगितले होते. सत्ताविरोधी लाटेचा सामना करणे ही पक्षासाठी मोठी चिंता आहे. हेच कारण आहे की, केंद्रीय नेतृत्वाने गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांना बदलण्याचा निर्णय घेतला. 2022 च्या अखेरिस होणाऱ्या 7 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत पक्षाच्या कार्यकर्त्यांना पुन्हा सक्रिय करण्यासाठी सर्व नवीन मंत्रिमंडळाने शपथ घेतली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP , election
  • First Published :
जाहिरात
जाहिरात