मराठी बातम्या /बातम्या /देश /

खासदार संजय राऊत यांच्या विरोधात नवी दिल्लीत गुन्हा दाखल, भाजप महिला मोर्चा आक्रमक

खासदार संजय राऊत यांच्या विरोधात नवी दिल्लीत गुन्हा दाखल, भाजप महिला मोर्चा आक्रमक

  'ज्या पद्धतीने भाजपने शिवसेनेच्या बाबतीत वातावरण पसरवलं गेलं त्याची गरज नव्हती.

'ज्या पद्धतीने भाजपने शिवसेनेच्या बाबतीत वातावरण पसरवलं गेलं त्याची गरज नव्हती.

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Published by:  Pooja Vichare

नवी दिल्ली, 13 डिसेंबर: शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपा कार्यकर्त्यांविषयी अपशब्द वापरल्याने हा गुन्हा दाखल केला आहे. भाजप महिला मोर्चाच्या प्रमुख दीप्ती रावत (Deepti Rawat) यांनी ही तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर दिल्लीमध्ये कलम 500 आणि 509 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय सचिव दिप्ती रावत यांनी तक्रार केली होती. तक्रार दाखल झाल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. संविधानिक पदावर असतानाही असभ्य भाषा वापरल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे.

त्यामुळे संजय राऊत यांनी माफी मागावी, अशी मागणी दीप्ती रावत यांनी केली आहे. नवी दिल्लीमधील मंडावली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी वापरलेल्या 'च' शब्दावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. शरद पवारांसोबतच एक फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यावरुन भाजपने त्यांचा ट्रोल केलं. यानंतर मात्र प्रतिक्रिया देताना संजय राऊत चांगलेच संतापले. यादरम्यान त्यांनी 'च' शब्दही उच्चारला. यानंतर आता भाजप नेत्यांनीही संताप व्यक्त केला. या प्रकरणात भाजप कार्यकर्त्यांनी दिल्ली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दिल्लीत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या विधानावरुन भाजपने आक्रमक पवित्रा घेत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

काय म्हणाले होते संजय राऊत?

राज्यसभेच्या खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. या निलंबनाच्या विरोधात निलंबित 12 खासदार हे संदसेदच्या परिसरात आंदोलन करत आहेत. या आंदोलनस्थळी मंगळवारी शरद पवार यांनी भेट दिली. त्यावेळी संजय राऊत हे खुर्ची उचलून शरद पवारांना बसण्यासाठी देतानाचा फोटो व्हायरल झाला होता. या फोटोवरुन भाजपनेही निशाणा साधला होता.

हेही वाचा- मोठी बातमी: उद्या किरीट सोमय्या करणार 100 कोटींच्या घोटाळ्याचा पदार्फाश

यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, "त्यावेळी तेथे लालकृष्ण अडवाणी जरी उपस्थित असते तर मी त्यांनाही खुर्ची दिली असती. शरद पवारांची प्रकृती, त्यांचे वय लक्षात गेता महाराष्ट्रातल्या पितृतुल्य, वडीलधाऱ्या माणसाला मी खुर्ची आणून दिली.

First published:

Tags: BJP, Sanjay raut, Shivsena