मुंबई, 13 डिसेंबर: भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) पुन्हा एकदा घोटाळा उघड करणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील (Mahavikas Aghadi government) नेते आणि मंत्र्यांवरील आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांची मालिका सुरुच ठेवली आहे. दरम्यान किरीट सोमय्या मंगळवारी म्हणजेच उद्या मुंबई महापालिकेचा (Municipal Corporation Corporation) 100 कोटींचा घोटाळा उघड करणार आहेत. किरीट सोमय्या यांनी शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्याशी संबंधित व्यक्तीवर गंभीर आरोप केला आहे. तसंच कोरोना काळात भ्रष्टाचारात शिवसेनेनं जागतिक रेकॉर्ड केला असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. हेही वाचा- बदलणार वाराणसीचे चित्र ! मोदींच्या हस्ते प्रकल्पाचं उद्घाटन, असेल भव्य कव्हरेज डोंबिवलीमध्ये भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. यावेळी बोलताना किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकार मधील नेत्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. या मेळाव्यास किरीट सोमय्या, भाजप आमदार रविंद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, नगरसेवक मंदार हळबे, मोरेश्वर भोईर आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. एम. एम. आर रिजनमधील महापालिकेचे घोटाळे उघड करणार असल्याचंही किरीट सोमय्या यांनी सांगितलं. अनिल परब यांचा परिचित व्यक्ती आणि एका अधिकाऱ्याचा 100 कोटींचा कोविड कॉन्ट्रॅक्ट घोटाळा केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.
उद्या १३ डिसेंबर दापोली दौरा, सकाळी ११ वाजता दापोली पोलीस स्टेशन येथे अनिल परब रिसॉर्ट घोटाळा FIR तक्रार च पाठपुरावा @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil pic.twitter.com/YQu5dsG8Cc
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) December 12, 2021
समीर वानखेंडेंच्या जन्मदाखल्याचा ही मुद्दा केला उपस्थित नवाब मलिक यांनी ट्विट केलेल्या समीर वानखेडे जन्मदाखल्याचे कोणतेही पुरावे मुंबई महापालिकेकडे नाहीत, अशी माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी महितीच्या अधिकारात दिल्याचं सोमय्या यांनी सांगितलं.
I welcome Nawab Bhai & getting ready to get arrested by Nawab Malik & His Maha VASOOLI Sarkar pic.twitter.com/JTKLIGHbpM
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) December 11, 2021
त्यांना कुठून तरी झेरॉक्स मिळाली ती त्यांनी दाखवली, असा दावा सोमय्या यांनी केला आहे. समीर वानखेडेचे जन्मदाखल्याचे गूढ रहस्य मुंबईचे महापौर, नवाब मलिक, आणि मुंबई पालिका आयुक्तांनी जनतेसमोर ठेवावे, असे सोमय्या म्हणाले.