एका लग्नामुळे संपूर्ण गाव आलं अडचणीत, क्वारंटाइन सेंटरमधून बाहेर पडलेल्या जोडप्याचा धक्कादायक प्रकार

एका लग्नामुळे संपूर्ण गाव आलं अडचणीत, क्वारंटाइन सेंटरमधून बाहेर पडलेल्या जोडप्याचा धक्कादायक प्रकार

अल्पवयीन जोडप्याला ग्रामस्थांनी दोन दिवसांनी बाहेर काढल्यानंतर दोघांनी मंदिरात लग्न केलं. आश्चर्याची बाब म्हणजे या घटनेची माहिती पंचायत प्रतिनिधींनाही नव्हती.

  • Share this:

मधुबनी (बिहार), 22 मे : देशात कोरोनाबाधितांच्या संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाही बऱ्याच ठिकाणी लग्न समारंभासारखे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. मात्र बिहारमधील मधुबनी (Madhubani) येथे एक धक्कादायक प्रकार घडला. येथील क्वारंटाइन सेंटरमध्ये असलेल्या एका अल्पवयीन प्रेम युगुलांनी चक्क पळून जाऊन लग्न केलं. या अल्पवयीन जोडप्याला ग्रामस्थांनी दोन दिवसांनी बाहेर काढल्यानंतर दोघांनी मंदिरात लग्न केलं. आश्चर्याची बाब म्हणजे या घटनेची माहिती पंचायत प्रतिनिधींनाही नव्हती.

दिल्लीवरून परतलं होतं जोडपं

सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर दिल्लीतील या जोडप्याचा लग्नाचा व्हिडीओ समोर आला आहे.  ही घटना मधुबनीच्या बेनीपट्टी ब्लॉकमधील नवरकही गावची असल्याचं सांगितलं जात आहे. नवरकही गावातील एका युवकानं दिल्लीहून एका मुलीला पळवून आणलं. त्यानंतर गावकऱ्यांनी दोघांना शाळेत क्वारंटाइन केले. मात्र क्वारंटाइनमधून बाहेर पडताच या दोघांनी मंदिरात जाऊन लग्न केलं. असं सांगण्यात येत आहे की लग्नादरम्यान सामाजिक अंतराच्या नियमांची पर्वा न करता मोठ्या संख्येने गावकरी जमले.

वाचा-भर चौकीत आरोपीनं धारधार चाकूने कापला पोलिसाचा कान, कारण वाचून व्हाल हैराण

वाचा-क्वारंटाइन सेंटरमधला धक्कादायक प्रकार, महिलांना साड्यांऐवजी दिली लुंगी

आता जोडप्यावर केली जाणार कारवाई

या प्रकरणातील नवरकाही पंचायतचे प्रमुख कृपानंद झा आझाद यांनी सांगितले की, कोरोनाच्या संकटात असे प्रकार घडणे धोकादायक आहे. हे जोडपं अल्पवयीन असल्यानं त्यांच्यावर आणि इतरांवरही कारवाई केली जाणार आहे. दरम्यान व्हिडीओ समोर आल्यानंतर एसडीएम मुकेश रंजन यांनी प्रकरण गांभीर्याने घेऊन चौकशीनंतर कारवाईचे आश्वासन दिलं आहे.

वाचा-संपर्कात न येता कोरोनाचे शिकार, घरातून बाहेर पडले नाही तरी 61 जण पॉझिटिव्ह

First published: May 22, 2020, 2:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading