क्वारंटाइन सेंटरमधला धक्कादायक प्रकार, महिलांना साड्यांऐवजी दिली लुंगी

क्वारंटाइन सेंटरमधला धक्कादायक प्रकार, महिलांना साड्यांऐवजी दिली लुंगी

क्वारंटाइन सेंटरमधला धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अस्वच्छतेनंतर आता महिलांना वाईट वागणुकही दिली जात आहे.

  • Share this:

दरभंगा (बिहार), 22 मे : कोरोनाचा प्रसार रोखण्याठी लोकांना क्वारंटाइन सेंटरमध्ये (Quarantine centre) ठेवले जात आहे. मात्र क्वारंटाइन सेंटरमध्ये सुविधांचा अभाव असल्यामुळं लोकं पळून येत आहेत. बिहारमधील क्वारंटाइन सेंटरमधील अस्वच्छतेचे फोटो व्हायरल झाल्यानंतर काही दिवसांपूर्वी क्वारंटाइन सेंटरमध्ये बार बाला बोलवल्याचा प्रकार घडला होता. आता बिहारमधून एक भयंकर प्रकार समोर आला आहे. क्वारंटाइनमध्ये राहणाऱ्या महिलांनी परिधान करण्यासाठी साड्या मागितल्यानंतर त्यांच्या हातात चक्क लुंगी देण्यात आली.

काय आहे संपूर्ण प्रकरण

ही घटना बिरोल ब्लॉकच्या देवकुली धाममधील क्वारंटाईन सेंटरमध्ये घडली. जिथं विचित्र परिस्थितीत राहणाऱ्या महिलांची स्थिती समोर आली. महिलांनी साडी मागितल्यानंतर त्यांना लुंगी देण्यात आली. यावर स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासनाविरोधात रोष आहे. जेवण आणि नाश्त्याच्या नावाखालीही केवळ कागदी कामे केली जात असल्याची तक्रारही लोकं करत आहेत.

वाचा-संपर्कात न येता कोरोनाचे शिकार, घरातून बाहेर पडले नाही तरी 61 जण पॉझिटिव्ह

मानवाधिकार संघटना आली चव्हाट्यावर

या प्रकरणात मानवाधिकार संरक्षण फाऊंडेशन पुढे आली आहे. संस्थेचे जिल्हाध्यक्ष प्रदीपकुमार चौधरी यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार आणि दरभंगाचे डीएम यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, दिल्ली, गाझियाबाद, मेरठ, बेंगळुरू आणि मुंबई येथून सुमारे 40 स्थलांतरित गेल्या दहा दिवसांपासून या केंद्रात वास्तव्यास आहेत. या केंद्रात राहणाऱ्या महिलांना साड्याऐवजी लुंगी देण्यात आली आल्या. देवकुली धाम आणि मिर्जापूरमधील बहुतेक लोक या केंद्रात आहेत. दरम्यान, जिल्हाध्यक्ष प्रदीपकुमार चौधरी यांनी मुख्यमंत्र्यांना इथल्या समस्येवर ईमेल केले असून त्यांनी मोबाईलवरून बिरोल उपविभागीय अधिकारी आणि मंडळ अधिकारी यांनाही कळवलं आहे.

वाचा-धक्कादायक! कोरोनाचा धोका वाढला, स्वॅब घेतल्यानंतर अवघ्या तासभरात रुग्णांचा मृत्य

वाचा-धक्कादायक! चीननंतर या देशाचा खोटारडेपणा उघड, तब्बल 19 हजार मृतांची माहिती लपवली

First published: May 22, 2020, 12:00 PM IST
Tags:

ताज्या बातम्या