धक्कादायक! चीननंतर या देशाचा खोटारडेपणा उघड, तब्बल 19 हजार मृतांची माहिती लपवली

धक्कादायक! चीननंतर या देशाचा खोटारडेपणा उघड, तब्बल 19 हजार मृतांची माहिती लपवली

आतापर्यंत 50 लाखांहून अधिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 3 लाखांहून अधिकांचा मृत्यू झाला आहे. मात्र आता या मृतांच्या आकड्यावर संशय व्यक्त केला जात आहे.

  • Share this:

रोम, 22 मे : जगात कोरोनानं थैमान घातले आहे. आतापर्यंत 50 लाखांहून अधिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 3 लाखांहून अधिकांचा मृत्यू झाला आहे. मात्र आता या मृतांच्या आकड्यावर संशय व्यक्त केला जात आहे. याआधी ब्रिटन आणि चीनवर कोरोना मृतांचा आकडा लपवल्याचा आरोप करण्यात आला होता. आता आणखी एका देशानं कोरोना मृतांचा आकडा लपवल्याचं समोर आलं आहे. हा देश आहे इटली.

चीननंतर इटलीत सर्वात जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. मात्र सध्या अमेरिकेत मृतांचा आकडा एक लाखांवर पोहचला आहे. मात्र आता इटलीमध्ये दिलेल्या आकड्यापेक्षा मृतांची संख्या जास्त असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोरोनामुळे इटलीत 32 हजार लोकांचा मृत्यू झाला, अशी माहिती सरकारनं दिली. मात्र इटलीच्या राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा एजन्सीने म्हटलं आहे की या मृत्यूची संख्या नोंदलेल्या संख्यापेक्षा 19 हजारपर्यंत जास्त असू शकते. आयएनपीएस इटलीमधील सर्वात मोठी सामाजिक सुरक्षा आणि कल्याण एजन्सी आहे. सरकारच्या आकडेवारीवर विसंबून राहणे शक्य नसल्याचे एजन्सीने स्पष्टपणे सांगितले आहे कारण मृत्यूच्या संख्येत एवढा मोठा फरक करता येणार नाही.

मृतांचा आकडा लपवला

एजन्सीने एका अभ्यासानुसार सांगितले आहे की गेल्या मार्च-एप्रिलमध्ये इटलीमध्ये एकूण 1 लाख 56 हजार 429 मृतांचा आकडा आहे. 2015 ते 2019 या काळात इटलीमध्ये झालेल्या मृत्यूच्या सरासरीपेक्षा ही संख्या 46,909 जास्त आहे. परंतु यापैकी केवळ 27,938 मृत्यू सिव्हिल प्रोटेक्शन एजन्सीने कोरोना विषाणूशी जोडले आहेत ज्यामुळे संशय निर्माण होतो. यापैकी 18,971 मृत्यू सामान्यपेक्षा अधिक आहेत, याचा शोध घेणे फार महत्वाचे आहे.

या व्यतिरिक्त एजन्सीने म्हटलं आहे की कोरोनाचा संसर्ग सर्वाधिक झालेल्या भागात या सर्व मृत्यूची नोंद झाली आहे. सरकारचे म्हणणे आहे की या भागात विशेषत: उत्तर इटलीमध्ये हे संक्रमण सर्वात वाईट होते. INPS म्हणते की वाढीव मृत्यूंना केवळ कोरोना विषाणूशी जोडले जाऊ शकत नाही परंतु कोव्हि-19 च्या रूग्णांमुळे लोकांना आरोग्यसेवा मिळू शकली नाही कारण त्यांच्याव्यतिरिक्त इतर रुग्णालयातही स्थान नव्हते. शुक्रवारपर्यंत, कोरोना विषाणूमुळे इटलीमध्ये अधिकृत मृत्यूचा आकडा 32 हजार 486 आहे आणि यापैकी 26 हजार 715 लोक उत्तर इटलीच्या लोम्बार्डीमध्ये मरण पावले आहेत. कोरोना विषाणूमुळे हा युरोपमधील सर्वात जास्त प्रभावित क्षेत्र आहे.

First published: May 22, 2020, 9:41 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading