भयंकर प्रकार! 6 वर्षांच्या चिमुकलीची निर्घृण हत्या, फुफ्फुस गायब; नग्न अवस्थेत सापडला मृतदेह

भयंकर प्रकार! 6 वर्षांच्या चिमुकलीची निर्घृण हत्या, फुफ्फुस गायब; नग्न अवस्थेत सापडला मृतदेह

जादूटोण्याच्या हेतूसाठी हा प्रकार करण्यात आला असावा अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्यानं हे कृत्य केलं असावं असा प्राथमिक अंदाज आहे.

  • Share this:

कानपूर, 15 नोव्हेंबर : मुलींवर अत्याचार आणि त्यांची निर्घृण हत्या होण्याचं नाव कमी होत नाहीय महाराष्ट्रा नुकतीच एका तरुणीवर अॅसिड टाकून जाळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर आणखीन एक मन हेलावून टाकणारी घटना लक्ष्मीपूजना दिवशी समोर आली आहे. 6 वर्षांच्या चिमुकलीची निर्घृण हत्या करून तिची फुफ्फुसं काढून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातील घाटमपूर परिसरातील भद्रस गावात राहणाऱ्या 6 वर्षांच्या मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली. या चिमुकलीचा मृतदेह सोमवारी सकाळी गावाजवळ नग्न अवस्थेत पोलिसांना सापडला आहे. या चिमुकलीची फुफ्फुसं काढून नेल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

हे वाचा-बीड हादरलं, प्रेयसीला अ‍ॅसिड आणि पेट्रोल टाकून जाळले,12 तास तडफडत होती तरुणी

या घटनेमुळे कानपुरात मोठी खळबळ उडाली आहे. जादूटोण्याच्या हेतूसाठी हा प्रकार करण्यात आला असावा अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्यानं हे कृत्य केलं असावं असा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी पोलिसांनी निष्पाप मुलीचा जीव घेणाऱ्या अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून गावात कसून चौकशी सुरू आहे.

असाच आणखीन एक धक्कादायक प्रकार झारखंडमधून देखील समोर आला आहे. तांत्रिकाच्या सांगण्यावरून वडिलांनी आपल्या पोटच्या 10 वर्षांच्या मुलीचा बळी दिला आहे. वडिलांनी आपल्या मुलीला तांत्रिकाच्या सांगण्यावरून बेदम मारहाण करून तिची निर्घृण हत्या केली आहे. ही घटना स्थानिक आणि पोलिसांना कळताच त्यांनी वडिलांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं तर अद्यापही तांत्रिक फरार असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तांत्रिक आणि वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: November 15, 2020, 11:16 AM IST

ताज्या बातम्या