महाराष्ट्रानंतर बिहारमध्येही ओवेसींचा डंका! एका वर्षात पालटवलं विधानसभा निवडणुकीतलं चित्र

महाराष्ट्रानंतर बिहारमध्येही ओवेसींचा डंका! एका वर्षात पालटवलं विधानसभा निवडणुकीतलं चित्र

या वर्षीच्या निवडणुकीत माजी केंद्रीय मंत्री उपेंद्रसिंह कुशवाहा यांच्या RLSP आणि मायावतींच्या बसपाशी युती करून AIMIMनं बिहारमध्ये 24 जागांवर उमेदवार उभे केले होते.

  • Share this:

पाटणा, 11 नोव्हेंबर : बिहार विधानसभा निवडणुकीत असददुद्दीन ओवेसींच्या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद- उल- मुसलमीन (AIMIM) पक्षाने सीमांचल भागातील विधानसभेच्या 5 जागांवर विजय मिळवला आहे. बिहार विधानसभेच्या 2019 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये AIMIMने पहिल्यांदा आपले उमेदवार उभे केले होते. त्यावेळी अमौरमधून अख्तरुल इमान, कोचाधमाममधून मोहम्मद इजहर असफी, जोकीहाटमधून शहनवाझ आलम, बैसीमधून सईद रुकनुद्दीन आणि बहादूरगंजमधून अझहर नायिमी यांनी AIMIM च्या तिकिटावर विजय मिळला होता.

या वर्षीच्या निवडणुकीत माजी केंद्रीय मंत्री उपेंद्रसिंह कुशवाहा यांच्या RLSP आणि मायावतींच्या बसपाशी युती करून AIMIMनं बिहारमध्ये 24 जागांवर उमेदवार उभे केले होते. सीमांचलातील अरारिया, पूर्णिया, किशनगंज आणि कटिहार या जिल्ह्यांतील मुस्लिमबहुल भागातून एमआयएम निवडणुकीत उतरले होते.

वाचा-'तसा शब्द 2019मध्ये आम्हालाही दिला', नितीश यांच्या भवितव्यावर सामनातून भाष्य

‘भाजपची B टीम AIMIM’

AIMIM ही भाजपची B टीम आहे असा प्रचार काँग्रेसनं केला होता. एमआयएमला मत दिली तर ती मुस्लिम मतांचं विभाजन करतील आणि ती भाजप-जनता दल युनायटेड यांच्या युतीलाच मिळतील असा प्रचार काँग्रेसनं केला होता. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले ‘बिहारमध्ये आमचा विजय निश्चित होता पण काही छोट्या पक्षांनी घात केला. ओवेसींच्या पक्षाने मतविभाजन केलं भाजपने आम्हाला लक्ष्य करण्यासाठी ओवेसींचा वापर केला.’

वाचा-बिहारच्या मुख्यमंत्रीपदी सातव्यांदा शपथ घेणार नितीश कुमार, रचणार इतिहास

2015 मध्ये चाललं नव्हतं नाणं

एमआयएमने बिहार विधानसभेच्या 2015 मधील निवडणुकीतही सीमांचलातील सहा जागा लढवल्या होत्या. त्यापैकी 5 जागांवर त्यांचं डिपॉझिट जप्त झालं होतं. कोचाधामममध्ये मात्र त्यांचा उमेदवार 26.14 टक्के मत मिळवत दुसऱ्या क्रमांकावर राहिला होता. काँग्रेसचे आमदार जावेद आलम लोकसभेत निवडून गेल्यामुळे 2019 मध्ये रिक्त झालेल्या किशनगंज विधानसभा मतदारसंघात एमआयएमच्या कामरूल हुडा यांनी ऑक्टोबर 2019 मधील पोटनिवडणुकीत 10 हजार 204 मतांनी विजय मिळवला होता. त्यांनी भाजपच्या स्विटी सिंग यांना पराभूत केलं होतं. बिहारमधील मुस्लिमबहुल सीमांचलात एमआयएमचा उदय झाला आहे. या भागातील अरारिया, किशनगंज, पूर्णिया आणि कटिहार हे चार जिल्हे प्रचंड मागास आहेत. वेगवेगळी सरकारं आली तरीही या जिल्ह्यांत पायाभूत सुविधाच उपलब्ध नाहीत. बिहारच्या उत्तरेतील या भागांत दरवर्षी पूराचा फटका बसतो.

Published by: Priyanka Gawde
First published: November 11, 2020, 12:03 PM IST

ताज्या बातम्या