Bihar Election Results 2020: बिहारच्या मुख्यमंत्रीपदी सातव्यांदा शपथ घेणार नितीश कुमार, रचणार इतिहास

Bihar Election Results 2020: बिहारच्या मुख्यमंत्रीपदी सातव्यांदा शपथ घेणार नितीश कुमार, रचणार इतिहास

3 निवडणुकीत मिळवला विजय, पण शपथ घेतली 6 वेळा; वाचा कसा राहिला नितीश कुमार यांचा मुख्यमंत्री म्हणून प्रवास.

  • Share this:

पाटणा 10 नोव्हेंबर: बिहार विधानसभेच्या (Bihar Assembly Election Results 2020) अटीतटीच्या निवडणुकीत अखेर NDAला बहुमत मिळालं असा दाव भाजपने केला आहे. यासह सातव्यांदा नितीश कुमार (Nitish Kumar) बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. बिहारमध्ये RJD हटवून मुख्यमंत्री पदावर विराजमान झालेल्या नितीश कुमार यांनी सत्ता हातातून जाऊ दिली नाही. 2005 मध्ये बहुमत घेऊन नितीश पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले मात्र 2000 च्या सुरुवातीलाच त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, काही दिवसांत त्यांचे सरकार बहुमत सिद्ध करू न शकल्यामुळे पडले.

2005मध्ये निवडणुक जिंकून झाले मुख्यमंत्री

त्यानंतर 2005 मध्ये नितीश कुमार हे भाजप आणि जेडीयूच्या व्यापक निवडणूक प्रचाराचा चेहरा बनले. राष्ट्रीय जनता दलाच्या दीर्घ राजवटीने निर्माण झालेल्या रागाचा नितीश यांना थेट फायदा झाला आणि 24नोव्हेंबर 2005 रोजी पुन्हा एकदा त्यांनी मुख्यमंत्र्यांची शपथ घेतली. यावेळी त्यांचे सरकार पाच वर्षे चालले. 2010 च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भाजप-जेडीयू युतीवर राज्यातील जनतेने विश्वास व्यक्त केला. यानंतर 26 नोव्हेंबर 2010 रोजी नितीश यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली.

जेव्हा नितीश यांनी राजीनामा दिला, आणि पुन्हा घेतली शपथ

2014मधील लोकसभा निवडणुकीत झालेल्या वाईट पराभवानंतर नितीश कुमार यांनी राजीनामा दिला होता. हा त्यांचा नैतिक निर्णय मानला गेला. ते आपल्या जुन्या साखी भाजपपासून विभक्त झाले होते आणि लोकसभा निवडणुकीत भाजपने जबरदस्त कामगिरी केली होती. नितीश यांनी जीतनराम मांझी यांना बिहारचे मुख्यमंत्री केले. परंतु त्यानंतर 22 फेब्रुवारी 2015 रोजी त्यांनी पुन्हा चौथ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

2015ची निवडणुक

विधानसभा निवडणुका त्याच वर्षी बिहारमध्ये घेण्यात आल्या. दशकांपासून एकमेकांचे प्रतिस्पर्धी असलेले नितीशकुमार आणि लालू प्रसाद यादव एक झाले. महायुतीच्या अंतर्गत या दोघांनी एनडीएसमोर निवडणूक लढविली. दोन्ही पक्षांना ऐतिहासिक विजय मिळाला आणि 20 नोव्हेंबर 2015 रोजी नितीशकुमार यांनी 5 व्यांदा वेळी शपथ घेतली.

लालू प्रसाद यांच्याशी वाद

जवळपास दोन वर्षांनी पुन्हा नितीशकुमार यांनी आरजेडीशी मतभेद झाले आणि ते पुन्हा भाजपमध्ये दाखल झाले. जुने सहकारी पुन्हा एकदा एकत्र आले. पण मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर नितीश यांची पकड तशीच राहिली. 27 जुलै 2017 रोजी सहाव्यांदा त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आता पुन्हा एकदा NDAने निवडणूक जिंकली. त्यामुळे आता नितीशकुमार सातव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना दिसतील.

Published by: Priyanka Gawde
First published: November 11, 2020, 7:31 AM IST

ताज्या बातम्या