मुंबई, 11 नोव्हेंबर : बिहार विधानसभेच्या अटीतटीच्या निवडणुकीत अखेर NDAला बहुमत मिळालं असा दाव भाजपने केला आहे. रात्री 11.15 वाजता भाजपने पत्रकार परिषद घेऊन बहुमताचा दावा केला. नितीश कुमार यांच्याच नेतृत्वाखाली सरकार बनणार असल्याचा दावा भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी केला. मात्र भाजप मोठा पक्ष असल्यामुळे या विजयातही नितीश कुमारांना दणका बसला आहे. त्यामुळे भाजपनं नितीश कुमारच मुख्यमंत्री होतील असे सांगितले असले तरी हा प्रश्न अधांतरीच असल्याचे, सामना अग्रलेखातून स्पष्ट करण्यात आले आहे.
या निवडणुकीत मोठ्या भावाची भूमिका सध्या भाजपकडे आहे. भाजपनं 73 तर जेडीयूला 43 जागा मिळाल्या आहेत. RJDला सर्वाधिक 75 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे "नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलास पन्नास जागांचा टप्पा गाठता आला नाही व भाजपने सत्तरी पार केली. नितीशकुमारांच्या पक्षास कमी जागा मिळाल्या तरी तेच मुख्यमंत्री होतील, असे अमित शहा यांना जाहीर करावे लागले. तसा शब्द तर 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेलाही दिला होता. तो शब्द पाळला गेला नाही व महाराष्ट्रात नवे राजकीय महाभारत घडले. आता कमी जागा मिळूनही नितीशकुमारांना दिलेला शब्द पाळला गेला तर त्याचे श्रेय शिवसेनेला द्यावे लागेल. बिहारात नेमके काय होईल? ते पुढच्या 72 तासांत स्पष्ट होईल", असा टोला सामना अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.
वाचा-Bihar Election: अखेर NDAचं बिहारवर वर्चस्व, तेजस्वीचं स्वप्न भंगलं!तेजस्वीपर्वाचे कौतुक
या निवडणुकीत तेजस्वी यादव यांच्या RJDला सर्वाधिक 75 जागा मिळाल्या. बिहारमधील सत्ताधाऱ्यांच्या झुंडशाहीसमोर 'तो' थांबला नाही. "बिहारची निवडणूक रंगतदार झाली. त्यात रंग भरण्याचे काम तेजस्वी यादवने केले. पंतप्रधान मोदी या बलदंड नेत्यासमोर व बिहारमधील सत्ताधाऱ्यांच्या झुंडशाहीसमोर तो थांबला नाही व अडखळला नाही. याची नोंद देशाच्या राजकीय इतिहासात राहील. बिहारची सूत्रे कुणाच्या हातात जायची ते जातील, पण बिहारच्या निवडणुकीने देशाच्या राजकारणाला तेजस्वी नावाचा मोहरा दिला आहे. त्याच्या लढय़ाचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच", अशा शब्दात तेजस्वी यादव यांचे कौतुक करण्यात आले आहे.
वाचा-LIVE : विजयातही नितीश कुमारांना दणका, मोठ्या भावाची भूमिका भाजपकडेसातव्यांदा शपथ घेणार नितीश कुमार?
सातव्यांदा नितीश कुमार (Nitish Kumar) बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. बिहारमध्ये RJD हटवून मुख्यमंत्री पदावर विराजमान झालेल्या नितीश कुमार यांनी सत्ता हातातून जाऊ दिली नाही. 2005 मध्ये बहुमत घेऊन नितीश पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले मात्र 2000 च्या सुरुवातीलाच त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, काही दिवसांत त्यांचे सरकार बहुमत सिद्ध करू न शकल्यामुळे पडले. त्यानंतर तीन निवडणुकात नितीश कुमार यांनी सहावेळा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.