Home /News /national /

Bihar Election 2020: तेजस्वी यादव यांची मोदींना 'काँटे की टक्कर', भाजपपेक्षा जास्त जागांवर आघाडी

Bihar Election 2020: तेजस्वी यादव यांची मोदींना 'काँटे की टक्कर', भाजपपेक्षा जास्त जागांवर आघाडी

निकालाचा पहिला कल तेजस्वी यादव (RJD Leader Tejashwi Yadav) यांच्या बाजूने असून एनडीए आणि महागठबंधनमध्ये काँटे की टक्कर पाहण्यास मिळत आहे.

    पाटणा, 10 नोव्हेंबर: बिहार विधानसभा निवडणूक निकालाची प्रतीक्षा देशभर आहे. सुरुवातीच्या काही राउंडमधून समोर आलेल्या माहितीनुसार काही प्रसिद्ध चेहऱ्यांची पिछेहाट झाली आहे. निकालाचा पहिला कल तेजस्वी यादव (RJD Leader Tejashwi Yadav) यांच्या बाजूने असून एनडीए आणि महागठबंधनमध्ये काँटे की टक्कर पाहण्यास मिळत आहे. तेजस्वी यादव यांच्या पक्षाने जोरदार मुसंडी मारली आहे. तेजस्वी यादव यांचा पक्ष 63 जागांवर आघाडीवर आहे तर भाजप 58 जागांवर आघाडीवर आहे. बिहारमधील लढत अटीतटीची असून एनडीए 106 तर महागठबंधन 110 जागांवर आघाडीवर आहे. बिहारमध्ये 'काँटे की टक्कर' याकरता आहे कारण याठिकाणी जोरदार प्रचार आणि शक्तिप्रदर्शन करण्यात आले होते. प्रत्येक पार्टीकडून जोरदार प्रचार करण्यात आला. 7 सप्टेंबरपासून सुरू झालेला प्रचार जवळपास दोन महिन्यांपर्यंत सुरू होता. भाजपाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 दिवसात वेगवेगळ्या ठिकाणी 12 सभा झाल्या. या जनसभांचे लाइव्ह प्रसारण देखील 400 पेक्षा अधिक ठिकाणी करण्यात आले होते. नरेंद्र मोदी यांचाच चेहरा 'बिहार विधानसभा निवडणुकी'साठी वापरण्यात आला होता. बिहारमध्ये एनडीएचा चेहरा असणारे नीतिश कुमार यांनी सतत 23 दिवसात 100 सभा घेतल्या होत्या. भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी देखील अनेक सभांना संबोधित केले होते. मात्र सुरुवातीच्या कल हाती आले आहेत, त्यानुसार तेजस्वी यादव यांचे पारडे जड आहे. तेजस्वी यादव यांनी देखील जोरदार प्रचार केला होता. त्यांनी एकट्याने 251 सभांना संबोधित केले होते. एका दिवसात 19 सभा घेण्याचा रेकॉर्डही त्यांनी केला आहे. (हे वाचा-खळबळजनक! बिहारमध्ये मतमोजणीआधी भाजप नेत्याच्या पतीची गोळी घालून हत्या) महागठबंधनचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तेजस्वी यादव आणि त्यांचे भाऊ बिहारचे माजी मंत्री तेज प्रताप यादव (Tej Pratap Yadav) त्यांच्या जागांवर आघाडीवर आहेत. तेजस्वी राघोपूर तर तेजप्रताप हसनपूरमधून रिंगणात आहेत. प्‍लूरल्‍स पार्टीच्या प्रमुख आणि सीएम पदाचे उमेदवारपुष्‍पम प्रिया चौधरी (Pushpam Priya Chaudhary) पिछाडीवर आहे. शत्रुघ्‍न सिन्‍हा यांचे सुपूत्र लव सिन्‍हा (Luv Sinha) देखील पिछाडीवर आहेत. जापचे नेते पप्पू यादव देखील पिछाडीवर आहेत. (हे वाचा-मध्य प्रदेशमध्ये शिवराज सरकारला मोठा दिलासा, ज्योतिरादित्य शिंदेंनी करून दाखवले) बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीस मंगळवारी सकाळपासून सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत एनडीए आणि महागठबंधन यांच्यात थेट निवडणूक लढाई सुरू आहे. एनडीए मुख्यत: भाजप आणि जेडीयू आहे, तर आरजेडी आणि कॉंग्रेसचे महागठबंधन आहे. बिहार विधानसभेच्या 243 जागांसाठी 28 ऑक्टोबरपासून 3 टप्प्यात मतदान झालं असून आज 38 जिल्ह्यासाठी मतमोजणी ही 55 मतदान केंद्रावर सकाळी 8 वाजता सुरू झाली आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Bihar, Bihar Election, Narendra modi, RJD

    पुढील बातम्या