Home /News /national /

खळबळजनक! बिहारमध्ये मतमोजणीआधी भाजप नेत्याच्या पतीची गोळी घालून हत्या

खळबळजनक! बिहारमध्ये मतमोजणीआधी भाजप नेत्याच्या पतीची गोळी घालून हत्या

Bihar Election 2020 च्या मतमोजणीच्या काही तास आधी एका भाजप नेत्याची गोळी घालून हत्या करण्यात आली आहे. आरा याठिकाणाहून पटनाकडे जाताना ही घटना घडली

    अभिनय प्रकाश, आरा, 10 नोव्हेंबर: बिहारमधील (Bihar) भोजपूर जिल्ह्यात मतमोजणीआधी (Bihar Election Result 2020) भयंकर प्रकार घडला आहे. मतमोजणीआधी काही आरोपींनी भाजप महिला मोर्चाच्या शहराध्यक्षाचे पती असणाऱ्या एका वकिलाची दिवसाढवळ्या हत्या केली आहे. ही घटना टाऊन पोलीस ठाणे क्षेत्रातील सुंदरनगर परिसरात घडली आहे. याठिकाणी काही मोटार सायकलस्वार सशस्त्र गुन्हेगारांनी सिव्हिल कोर्टाच्या वकिलावर गोळ्या झाडून त्यांना गंभीर जखमी केले आहे. यानंतर त्यांना तातडीने शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तरी देखील त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना पाटणा याठिकाणी हलवण्याची व्यवस्था केली गेली. पण वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. मयत वकिलाचे नाव प्रीतम नारायण सिंह उर्फ साहेब सिंह असून ते भाजप महिला मोर्चा शहराध्यक्ष असणाऱ्या नेत्याचे पती आहेत. या विधानसभा निवडणुकीमध्ये देखील त्या विशेष सक्रीय होत्या. निकालाआधी त्यांच्या पतीची हत्या झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. (हे वाचा-Bihar Election Results: तेजस्वी यादव यांची आघाडी, भाजपला जोरदार टक्कर) माहिती मिळताच भोजपूर एसपी हर किशोर राय, एसपीडीपीओ पंकज कुमार रावत, शहर पोलीस प्रमुख धर्मेंद्र कुमार, नवादा पोलीस स्टेशनचे अध्यक्ष संजीव कुमार घटनास्थळी दाखल झाले. मयत वकिलांच्या मुलाने अशी माहिती दिली की, त्यांचे वडील संध्याकाळी सिव्हिल कोर्टातून मोटार सायकलवरून परतत होते तेव्हा सुंदरनगर मोहल्ल्यामध्ये मंदिराजवळ दोन सशस्त्र बाइकस्वारांनी त्यांना थांबवले आणि त्यांच्यावर गोळी झाडली. (हे वाचा-MP By Election Result 2020: 32 राउंडमध्ये होणार मतमोजणी, कडेकोट बंदोबस्त तैनात) मयत प्रीतम नारायण सिंह यांच्या डोक्यात आणि पाठीवर गोळी लागली आहे. त्यांचा मुलगा प्रियदर्शी यांनी दिलेल्या माहितीनुसार सिंह यांचा त्यांच्या काकांशी जमिनीवरून वाद होता. अद्याप याबाबत कोणतीही ठोस माहिती हाती लागली नाही आहे. भोजपूरचे एसपी हर किशोर राय म्हणाले की, सध्या या प्रकरणात मृताच्या कुटुंबीयांच्या जबाबाच्या आधारे तपास सुरू आहे आणि जो कुणी दोषी आढळेल त्यावर त्वरित कारवाई केली जाईल. याप्रकरणी पोलिसांनी सध्या दोन जणांना अटक केली आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Bihar, Bihar Election, Crime news

    पुढील बातम्या