Bypoll 2020 : मध्य प्रदेशमध्ये शिवराज सरकारला मोठा दिलासा, ज्योतिरादित्य शिंदेंनी करून दाखवले

Bypoll 2020 : मध्य प्रदेशमध्ये शिवराज सरकारला मोठा दिलासा, ज्योतिरादित्य शिंदेंनी करून दाखवले

कमलनाथ सरकारला (Kamalnath) खिंडार पाडण्याची मोठी भूमिका बजावणारे ज्योतिरादित्य शिंदे (jyotiraj sindhiya scindia)यांनी पोटनिवणुकीत अखेर यश मिळवून दाखवले आहे.

  • Share this:

भोपाळ, 10 नोव्हेंबर : मध्य प्रदेशमध्ये  (Madhya Pradesh)कमलनाथ सरकारला (Kamalnath) खिंडार पाडण्याची मोठी भूमिका बजावणारे ज्योतिरादित्य शिंदे (jyotiraj sindhiya scindia)यांनी पोटनिवणुकीत अखेर यश मिळवून दाखवले आहे. मध्य प्रदेशमधील पोटनिवडणुकीचे कल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. भाजपने मोठी आघाडी घेतली आहे. बहुमतासाठी लागणारा आकडा भाजपने पार केला आहे.

मध्य प्रदेशमध्ये 28 जागांसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली आहे.   28 जागांपैकी 18 जागांवर भाजपने आघाडी घेतली आहे. त्यामुळे बहुमतासाठी लागणाऱ्या 116 जागांचा आकडा भाजपने पार केला आहे.  एकूण 125 जागांवर भाजप पोहोचली आहे.  तर काँग्रेसने 8 जागांवर आघाडीवर असून बसपा 2 जागेवर आघाडी घेतली आहे.

मध्य प्रदेशमध्ये मार्च महिन्यात काँग्रेसला मोठे खिंडार पडले होते. एकाच वेळी 22 आमदारांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे कमलनाथ सरकार अल्पमतात आले आणि कोसळले. ज्योतिरादित्य शिंदे यांनी बंडखोरी केल्यामुळे समर्थक 22 आमदारांनी काँग्रेसची साथ सोडली होती. ज्योतिरादित्य शिंदे हे भाजपमध्ये दाखल झाले आहे. मध्य प्रदेशमध्ये 230 विधानसभा जागा आहे, यात भाजपकडे 107, काँग्रेसकडे 87, बसपा दोन, सपा 1 आणि 4 अपक्ष आहे.  पोटनिवडणुकीची घोषणा झाल्यानंतर दमोह येथून काँग्रेसचे आमदार राहुल लोधी यांनीही काँग्रेसची साथ सोडून भाजपमध्ये दाखल झाले. मध्य प्रदेशमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी 115 बहुमताचा आकडा गाठणे गरजेचं आहे. भाजपला आणखी 8 जागांची गरज आहे. तर काँग्रेसला 28 जागा जिंकाव्या लागणार आहे.

विशेष म्हणजे, विविध संस्था आणि वृत्तवाहिन्यांच्या एक्झिट पोलमध्ये भाजपला दिलासा मिळाला आहे.  इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडिया एक्झिट पोलनुसार, विधानसभेच्या 28 जागांवर झालेल्या पोटनिवणुकीत भाजपला 16 ते 18 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काँग्रेस 10 ते 12 जागांवरच समाधान मानावे लागणार, असं हा एक्झिट पोल सांगतो.

Published by: sachin Salve
First published: November 10, 2020, 9:52 AM IST
Tags:

ताज्या बातम्या