जाहिरात
मराठी बातम्या / देश / Train accident : कोरोमंडल ट्रेन अपघातानंतर रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय, तुमच्यावर होणार थेट परिणाम

Train accident : कोरोमंडल ट्रेन अपघातानंतर रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय, तुमच्यावर होणार थेट परिणाम

Train accident

Train accident

Train accident : अजूनही रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. या संपूर्ण घटनेचे व्हिडीओ आणि फोटो अंगावर काटा आणणारे आहेत.

  • -MIN READ Odisha
  • Last Updated :

भुवनेश्वर : तुम्ही ट्रेनने प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आज भारतीय रेल्वेकडून बऱ्याच ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही ट्रेनचे रुट बदलले आहेत. वंदे भारत एक्स्प्रेसचं उद्घाटन आज होणार होतं ते देखील आज रद्द करण्यात आलं आहे. यामागचं कारण कोरोमंडल रेल्वे अपघात आहे. कोरोमंडल ट्रेनचा भीषण अपघात झाला आहे. एक नाही तर तीन ट्रेनची धडक झाली आहे. 9 डब्बे ट्रॅक सोडून बाजूला उलटले. हा अपघात इतका भयंकर आणि भीषण आहे की ट्रेनच्या काही बोगींचा अक्षरश: चुराडा झाला आहे.

Train Accident : कोरोमंडल ट्रेन अपघाताचा पहिला ड्रोन VIDEO, पाहून अंगावर येईल काटा

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी घटनास्थळावर जाऊन पाहाणी केली. तर अजूनही रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. या संपूर्ण घटनेचे व्हिडीओ आणि फोटो अंगावर काटा आणणारे आहेत. दक्षिण पूर्व रेल्वेनं दिलेल्या माहितीनुसार 280 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. साधारण 650 जखमी प्रवाशांना गोपालपूर, खंतापारा, बालासोर, भद्रक आणि सोरो येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. Image

Odisha Train Accident :डबे नदीत कोसळले, रुळावरून घसरले, समोरासमोर धडक, हे आहेत आतापर्यंतचे देशातील 7 सर्वात भीषण रेल्वे अपघात
जाहिरात

Image

रेल्वे ट्रकसमोर छिन्नविछिन्न मृतदेहांचा खच अन् तो वाजणारा मोबाइल; कोरोमंडल अपघाताचे अस्वस्थ करणारं वास्तव

याच पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयाने काही महत्त्वाचे निर्णय घेतला आहे. आतापर्यंत 48 गाड्या रद्द केल्या आहेत, 39 ट्रेन दुसऱ्या मार्गानं वळवण्यात आल्या आहेत. 10 ट्रेन शॉर्ट टर्मिनेटेड करण्यात आल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात