मुंबई 02 ऑगस्ट : पवित्र श्रावण (Shrawan) महिना सुरू झाला आणि सणांना पण सुरुवात झाली आहे. हा महिना सणांचा असतो असं म्हटलं जातं. त्यातच आज मंगळवारी (2 ऑगस्ट 2022) नागपंचमी आहे. या सणाला विशेष महत्त्व असून आजच्यादिवशी नागदेवतेची पूजा केली जाते. नागपंचमीला भगवान शंकरांचा (lord Shiva) दागिना म्हणजेच नागांची पूजा करण्याची प्रथा आहे. नागपंचमीच्या दिवशी महादेवांसह नागांची पूजा केल्याने जीवनातील सर्व पाप-दोष नष्ट होतात. यंदाची नागपंचमी अनेक शुभ योग घेऊन आली आहे. ज्योतिषांच्या मते नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा केल्याने आध्यात्मिक शक्ती, सिद्धी आणि अपार संपत्ती प्राप्त केली जाऊ शकते. तसंच कुंडलीत राहू-केतूची स्थिती ठीक नसली तरी या दिवशी विशेष पूजा करून लाभ मिळवता येऊ शकतो. या संदर्भात आज तकने वृत्त दिलंय. भारतातच नाही विदेशातही आहेत महादेवाचे भक्त, पाहा भारताबाहेरील शिवमंदिराचे फोटो नागपंचमीचा शुभ मुहूर्त नागपंचमीचा सण आज मंगळवारी म्हणजेच 2 ऑगस्ट रोजी आहे. श्रावण महिन्यातील पंचमी तिथी 2 ऑगस्ट रोजी पहाटे 5.14 ते 3 ऑगस्ट रोजी पहाटे 5.42 वाजेपर्यंत असेल. तर, नागपंचमीच्या पूजेचा शुभ मुहूर्त (Nag Panchami Shubh Muhurt) 2 ऑगस्ट रोजी पहाटे 5.14 ते 8.24 वाजेपर्यंत राहील. म्हणजेच नागपंचमीच्या दिवशी पूजेसाठी तुम्हाला फक्त 2 तास 42 मिनिटे मिळतील. या वेळेत तुम्ही नागाची पूजा करून घ्यायला हवी. नागपंचमीचा शुभ योग या वर्षी नागपंचमीलाही अनेक शुभ योग आले आहेत. या वेळी चार शुभ योगांमध्ये नागपंचमी साजरी केली जाणार आहे. या दिवशी संजीवनी योग, शिवयोग, रवियोग आणि सिद्ध योग असेल. या शुभ योगांमुळे नागपंचमीच्या सणाचं महत्त्व अधिकच वाढलं आहे. या शिवाय नागपंचमीच्या दिवशीच श्रावणातील तिसरा मंगळवारही आहे. या दिवशी मंगळागौरीची पूजा केल्याने इच्छित फळ मिळतं. अशा योगांमध्ये नागपंचमीला नागांची पूजा केल्यास जीवनात येणाऱ्या संकटांपासून मुक्ती मिळते. Nag Panchami : नागपंचमीनिमित्त व्हॉट्सअप स्टेटसला ठेवा ‘हे’ सुंदर शुभेच्छापर संदेश, इतरांनाही करा शेअर हिंदू धर्मातील नागांचं पौराणिक महत्त्व सनातन धर्मात सापांना विशेष महत्त्व (Nag Panchami Significance) आहे. सृष्टीकर्ते भगवान शिव यांच्या गळ्यात नेहमी नाग असतात. पृथ्वी शेषनागाच्या कुशीवर विसावली आहे. भगवान विष्णू स्वतः क्षीरसागरातील शेषनागाच्या बिछान्यावर झोपतात. श्रीकृष्णाच्या जन्माच्या वेळी वासुदेवांनी नागाच्या मदतीने यमुना पार केली. समुद्रमंथनाच्या वेळी वासुकी नागानेही देवतांना मदत केली होती. असे नागांशी संबंधित अनेक संदर्भ हिंदू धर्मातल्या पुराणांमध्ये सांगितले आहेत. अशा पद्धतीने मुहूर्ताच्या वेळेत नागदेवतेची पूजा केल्यास तुम्हाला त्याचे लाभ मिळतील आणि जीवन आनंदी होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.