मराठी बातम्या /बातम्या /देश /

India@75 : देशाच्या अशा 5 नायिका ज्यांनी रात्रीतून ब्रिटीश सरकारला दिला होता हादरा

India@75 : देशाच्या अशा 5 नायिका ज्यांनी रात्रीतून ब्रिटीश सरकारला दिला होता हादरा

Indian Freedom Fighters : आज आम्ही अशा पाच महिलांबद्दल सांगणार आहोत ज्यांनी या स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

Indian Freedom Fighters : आज आम्ही अशा पाच महिलांबद्दल सांगणार आहोत ज्यांनी या स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

Indian Freedom Fighters : आज आम्ही अशा पाच महिलांबद्दल सांगणार आहोत ज्यांनी या स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

  • Published by:  Rahul Punde
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानासाठी महात्मा गांधी, नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल यांची नावे खूप घेतली जातात. पण, भारतीय महिलांच्या योगदानाशिवाय हा स्वातंत्र्यलढा अपूर्ण आहे. पुरुषांना या चळवळींचा भाग बनणे सोपे होते. परंतु, महिलांना चळवळीपर्यंत पोहोचण्यापूर्वी समाजाच्या असंख्य बेड्या तोडाव्या लागल्या, त्यानंतरही अनेक भारतीय महिलांनी या लढ्यात स्वातंत्र्यसैनिक म्हणून काम करून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यांचे हे बलिदान कधीही विसरता येणार नाही. कमलादेवी चटोपाध्याय Kamaladevi Chattopadhyay कमलादेवींचे स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाचे योगदान आहे, विचारवंत म्हणून त्या गांधी किंवा आंबेडकर यांच्यापेक्षा कमी नव्हत्या. जातीपासून रंगभूमीपर्यंत प्रत्येक विषयात त्यांची आवड होती, पण त्यांचे नाव इतिहासाच्या पानात कुठेतरी हरवले आहे. कमलादेवींनीच महात्मा गांधींना सत्याग्रहात महिलांचा समावेश करण्याची विनंती केली होती. स्वातंत्र्य मिळेपर्यंत कमलादेवी अनेकवेळा तुरुंगात गेल्या, कधी गांधींच्या नावाचा जप करत मीठ विकल्याबद्दल तर कधी भारत छोडो आंदोलनात भाग घेतल्याबद्दल. 1928 मध्ये कमलादेवी यांची अखिल भारतीय काँग्रेस कमिटीवर निवड झाली आणि 1936 मध्ये त्या काँग्रेस सोशालिस्ट पार्टीच्या अध्यक्षा झाल्या. यानंतर, 1942 मध्ये अखिल भारतीय महिला परिषदेच्या अध्यक्षा बनून, त्यांनी महिलांना प्रसूती रजा देण्याबद्दल आणि त्यांच्या बिनपगारी श्रमाकडे दुर्लक्ष न करण्याबद्दल मत मांडलं. सरोजिनी नायडू Sarojini Naidu इतिहासाच्या पानांमध्ये कोकीळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या सरोजिनी नायडू भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा झाल्या. त्यांनी महिलांना समाजातील वाईट गोष्टींविरुद्ध जागरुक केले आणि स्वातंत्र्य चळवळीत भाग घेत राहिल्या. सरोजिनी यांना राजकारणाव्यतिरिक्त लेखनाचीही प्रचंड आवड होती. आपल्या हयातीत स्त्रियांसाठी लढण्याबरोबरच त्यांनी अनेक प्रसिद्ध पुस्तकेही लिहिली. जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ त्यांनी आपला कैसर-ए-हिंद सन्मान परत केला होता. स्वातंत्र्यानंतर सरोजिनी उत्तर प्रदेशच्या पहिल्या महिला राज्यपाल बनल्या. India@75 : स्वातंत्र्यानंतर खेळातील असे पराक्रम, ज्याने देशाचा जगभर वाजला डंका! काही तुम्हालाही माहीत नसेल भीकाजी कामा Bhikaiji Cama भारतीय महिला स्वातंत्र्यसैनिक भिकाजी कामा यांनीही स्वातंत्र्यासाठी खूप जोर लावला. परदेशात भारतीय ध्वज फडकवणाऱ्या भिकाजी कामा या पहिल्या महिला होत्या. त्यावेळी भारत स्वतंत्र नव्हता आणि ब्रिटीश ध्वज भारतासाठी वापरला जात होता. त्यांना हे मान्य नव्हते म्हणून त्यांनी स्वतः भारतासाठी तिरंगा तयार करून तो फडकवला. आजारपणामुळे 33 वर्षे भिकाजी भारतापासून दूर राहिल्या, पण दूर राहूनही त्यांचे स्वातंत्र्याचे स्वप्न कायम राहिले. ती युरोपातील विविध देशांमध्ये जाऊन भारताच्या स्वातंत्र्यासाठी घोषणा देत राहिल्या. त्यांनी पॅरिस इंडियन सोसायटीची स्थापना केली आणि त्यात वंदे मातरम् हे क्रांतिकारी मासिक काढले. अॅनी बेझंट Annie Besant अॅनी बेझंटचा जन्म लंडनमध्ये झाला असला तरी 1893 मध्ये भारतात आल्यानंतर त्या इथेच राहिल्या. 1917 मध्ये बेझंट भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षही होते. त्यांनी ब्रदर्स ऑफ सर्व्हिस संस्थेची स्थापना केली आणि भारतात प्रचलित असलेल्या वाईट गोष्टींविरुद्ध आवाज उठवला आणि त्याच्या मदतीने बालविवाह आणि जातिवाद यासारख्या मुद्द्यांवर जोरदार टीका केली. न्यू इंडिया या वृत्तपत्राद्वारे त्यांनी ब्रिटीश सरकारकडे भारतात स्वराज्याची मागणी केली. बेझंट यांनी 1916 मध्ये भारतात होमरूल चळवळ सुरू केली. India@75: ..तर स्वातंत्र्य युद्धात देशभक्तांचं रक्त उसळवणारं वंदे मातरम् जन्मलं नसतं अरुणा असफ अली Aruna Asaf Ali अरुणा असफ अली यांनी भारत छोडो आंदोलन सुरू केले. मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा झेंडा फडकवून त्यांनी तरुणांना प्रेरीत केले होते. 1930 च्या मिठाच्या सत्याग्रहादरम्यान अरुणा यांनी मोठ्या सभांना संबोधित केले, त्यानंतर त्या तुरुंगातही गेल्या. 1932 मध्ये तुरुंगात असताना त्यांनी कैद्यांना होणाऱ्या गैरवर्तनाच्या निषेधार्थ उपोषण केले. अरुणा यांना भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील ग्रँड ओल्ड लेडी म्हणूनही ओळखले जाते.
First published:

Tags: Independence day, Nari Shakti, Women

पुढील बातम्या