बाडमेर, 21 जुलै : पश्चिम राजस्थानमधील बारमेर या सीमावर्ती जिल्ह्यातील एक चहाचे दुकान सध्या चर्चेत आले आहे. दुकानाच्या नावामुळे हे दुकान लोकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले असून या दुकानात चहा पिण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे. बाडमेरमधील एका व्यक्तीने ‘बेवफा चहावाला’ नावाचा नवीन स्टार्टअप सुरु केला असून येथील चहा पिण्यासाठी लोक गर्दी करतात. सध्या अनेक लोक स्टार्टअप बिझनेस म्हणून चहाची दुकाने उघडत आहे. यात त्यांचे चहाचे दुकान लोकांच्या लक्षात रहावे आणि लोक दुकानाकडे आकर्षित व्हावेत यासाठी विशेष प्रयत्न करताना दिसतात. असेच अनोखे स्टार्टअप बाडमेरच्या प्रवीण सिंग यांने सुरु केले. त्यांनी आपल्या चहाच्या दुकानाला बेवफा चहा असे नाव देऊन येथे प्रेमात फसवणूक झालेल्या लोकांसाठी 10 रुपयात स्पेशल चहा दिली जाते, तर प्रेमात आखंट बुडालेल्या प्रेमी युगुलांना 15 रुपये किंमतीही स्पेशल चहा दिला जातो.
Seema Haider News: हॉटेल रूमवर लग्न… 4 हजार पेमेंट, सीमा हैदर आणि सचिनची रूम नंबर 204 मधील कहाणी प्रवीण सिंग हा बाडमेर शहरातील बलदेव नगर येथील रहिवासी असून सध्या तो फोटोग्राफीसह बीए फायनलचे शिक्षण घेत आहे. चहा विक्रेते प्रवीण सिंह सांगतो की, तो मित्रांसोबत बसला असताना त्याला बेवफा चहाचा व्यवसाय सुरु करण्याची आयडिया आली. प्रवीण सिंह यांच्या दुकानात चहा पिल्यानंतर बेवफा चहा लिहिलेल्या बोर्ड सोबत सेल्फी काढण्यासाठी लोकांची मोठी गर्दी होते.

)







