जाहिरात
मराठी बातम्या / देश / तब्बल 4 दिवसांपासून घरात लटकत होते 4 मृतदेह; 9 महिन्याच्या बाळाने भुकेने सोडला जीव

तब्बल 4 दिवसांपासून घरात लटकत होते 4 मृतदेह; 9 महिन्याच्या बाळाने भुकेने सोडला जीव

तब्बल 4 दिवसांपासून घरात लटकत होते 4 मृतदेह; 9 महिन्याच्या बाळाने भुकेने सोडला जीव

Bengaluru Family Suicide: एका घरात एकाच कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह अत्यंत वाईट अवस्थेत आढळून आले आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

बंगळुरु, 18 सप्टेंबर: बंगळुरूच्या ब्यादरहल्ली (Byadarahalli) भागात एका घरात एकाच कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह अत्यंत वाईट अवस्थेत आढळून आले आहेत. वेगवेगळ्या खोलीत चार लोकांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत तर 9 महिन्याच्या मुलाचा मृतदेह बेडवर आढळून आला आहे. कुटुंबातील सदस्यांच्या आत्महत्ये (Suicide) नंतर मुलाचा भूकेनं मृत्यू झाल्याचा दावा काही रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. भारती (51), सिंचन (34), सिंधुराणी (31) आणि मधुसागर (25) अशी मृतांची नावे आहेत. एका पोलीस अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी जेव्हा पोलीस घरात शिरले तेव्हा त्यांना घरातील सदस्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केलेल्याचं दिसून आलं. कौटुंबिक कलहामुळे कुटुंबीयांनी आत्महत्या करण्याचं पाऊल उचलल्याचं म्हटलं जात आहे. तसंच या कुटुंबियांचा मृत्यू जवळपास 4 दिवसांपूर्वी झाल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. नक्षलवाद्यांच्या नावानं MBBS डॉक्टरला धमकी, मुंबईत आरोपी महिला अटकेत घराचे मालक हालेगिरी शंकर तीन ते चार दिवसांनी जेव्हा घरी पोहोचले तेव्हा ही घटना उघडकीस आली असल्याचं बंगळुरु पश्चिमचे डीसीपी संजीव पाटील यांनी सांगितलं. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, हालेगिरी शंकर यांनी सांगितलं की गेल्या दोन-तीन दिवसांपासून कोणीही त्यांचा फोन उचलत नव्हतं. जेव्हा घरी पोहोचलो तेव्हा घराला कुलूप दिसलं. पाटील यांनी पुढे सांगितलं की, शंकर यांनी पोलिसांना माहिती दिली आणि दरवाजा तोडण्यात आला. घरात प्रवेश करताच कुटुंबियातल्या चार जणांचे मृतदेह वेगवेगळ्या खोल्यांमध्ये छतावर लटकलेले आढळले आणि लहान बाळाचा मृतदेह बेडवर आढळून आला. दरम्यान या घरातून अडीच वर्षांच्या मुलीला वाचवण्यात आलं आहे. तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात असून तिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. ‘विराट कोहलीला T20 नंतर आणखी एका टीमची कॅप्टनसी सोडावी लागणार’, माजी क्रिकेटपटूचा दावा   या घटनेचा अधिक तपास सुरु आहे. पाटील यांनी सांगितलं की, फॉरेन्सिक सायन्स लेबोरटरीला पाचारण करण्यात आले असून वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. धक्कादायक! BCCI च्या स्पर्धा सुरू होण्यापूर्वी भारतीय कोचचा मृत्यू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती शंकर यांची पत्नी आहे. अन्य तीन जण त्यांची मुलं आहेत. 9 महिन्यांचा मुलगा आणि अडीच वर्षांची मुलगी ही भारती आणि शंकर यांची नातवंडं आहेत. बुराडी आत्महत्या प्रकरण 2018 मध्ये दिल्लीतील बुराडी (Burari)येथे अशाच प्रकारची घटना घडली होती. जिथे एका कुटुंबातील 11 सदस्य घराच्या छताला लटकलेले आढळले होते. संबंधित कुटुंबातील वृद्ध कुटुंबप्रमुखांपासून ते लहान मुलांपर्यंत, तीन पिढ्यांतील स्त्री आणि पुरुष सकाळी गळफास घेतलेल्या स्थितीत आढळले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात