Home /News /mumbai /

Mumbai Crime News: YouTube बघून नक्षलवाद्याच्या नावानं पाठवलं पत्र, MBBS डॉक्टरकडून खंडणी मागणारी महिला अटकेत

Mumbai Crime News: YouTube बघून नक्षलवाद्याच्या नावानं पाठवलं पत्र, MBBS डॉक्टरकडून खंडणी मागणारी महिला अटकेत

या महिलेला अटक करण्यामागचं कारण ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.

  मुंबई, 18 सप्टेंबर: मुंबई क्राईम ब्रांन्चनं (Mumbai Crime Branch) एका महिलेला अटक केली आहे. या महिलेला अटक करण्यामागचं कारण ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. नक्षलवाद्यांच्या (Naxalite) नावानं धमकी देऊन खंडणी मागणाऱ्या महिलेच्या मुसक्या आवळल्या आहेत. या महिलेनं MBBS डॉक्टरला (Doctor) नक्षलवाद्यांच्या नावानं पत्र पाठवून पैशांची मागणी केली होती. अटक करण्यात आलेल्या महिलेनं MBBS डॉक्टरला नक्षलवाद्यांच्या नावानं पत्र पाठवलं होतं. या पत्रात आरोपी महिलेनं 50 लाखांची मागणी केली होती. डॉक्टरला लाल सलाम या नक्षलवाद्याच्या नावानं खंडणीचे पत्र पाठवलं होतं. Alert! लोकल ट्रेनमध्ये होणार Gas Attack?,गुप्तचर यंत्रणेचा इशारा या पत्रात या महिलेनं खंडणी न दिल्यास जीवे मारण्याचीही धमकी दिली होती. खंडणी न दिल्यास डॉक्टरची आणि त्याच्या मुलाची हत्या करण्याची धमकी पत्रात देण्यात आली होती. 'विराट कोहलीला T20 नंतर आणखी एका टीमची कॅप्टनसी सोडावी लागणार', माजी क्रिकेटपटूचा दावा  मुंबई क्राइम ब्रँच युनिट 12 ने महिला आरोपी आणि मुख्य सूत्रधार व्यतिरिक्त आणखी एकाला अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे यूट्यूब बघून डॉक्टरला लुटण्याचा प्लान करण्यात आल्याची कबूली आरोपींनी दिली आहे.

  तुमच्या शहरातून (मुंबई)

  Published by:Pooja Vichare
  First published:

  Tags: Crime news, Mumbai News

  पुढील बातम्या