मुंबई, 18 सप्टेंबर : बीसीसीआयच्या (BCCI) देशांतर्गत स्पर्धांना काही दिवसांमध्ये सुरूवात होत आहे. कोरोना व्हायरसमुळे मागील वर्षी संपूर्ण सिझन होऊ शकला नव्हता. आता 28 सप्टेंबरपासून विनू मंकड ट्रॉफीनं हा सिझन सुरू होत आहे. त्यापूर्वीच एक धक्कादायक घटना घडली आहे. बंगालचे माजी बॉलर आणि मिझोरम अंडर 19 टीमचे हेड कोच मुर्तजा लोगधर यांचा मृत्यू झाला आहे. विशाखपट्टणममध्ये त्यांचा मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री जेवणानंतर आलेल्या हार्ट अटॅकमुळे त्यांनी जगाचा निरोप घेतला. (Mizoram U-19 head coach Murtaza Lodhgar dies of heart attack)
विनू मंकड स्पर्धेसाठी 45 वर्षांचे मुर्तझा मिझोरमच्या टीमसोबत विशाखापट्टणममध्ये होते. रात्रीच्या जेवणानंतर त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अविषेक डालमिया यांनी दिली.
मुर्तझा जेवणानंतर फिजियोसोबत फिरण्यासाठी बाहेर पडले होते. त्यावेळी अचानक त्यांच्या छातीमध्ये दुखू लागलं आणि ते रस्त्यावर पडले. त्यावेळी फिजिओ आणि टीमच्या अन्य सदस्यांनी त्यांना तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. तिथं रात्री उशीरा त्यांना मृत घोषित करण्यात आले.
टीम इंडियाच्या भावी कोचला रवी शास्त्रींचा गंभीर इशारा, पद सोडण्यापूर्वी म्हणाले...
या घटनेवर माझा अजूनही विश्वास बसत नसल्याचं दालमिया यांनी सांगितलं. ते माझे आवडत्या क्रिकेटपटूपैकी एक होते. त्यांनी आमच्या महिला टीमसोबतही काम केलं आहे. त्यांचा मृत्यू हे माझ्यासाठी वैयक्तित नुकसान असल्याचं दालमिया यांनी स्पष्ट केले.
'विराट कोहलीला T20 नंतर आणखी एका टीमची कॅप्टनसी सोडावी लागणार', माजी क्रिकेटपटूचा दावा
मुर्तझा यांचा परिवार शनिवारी विशाखपट्टणमला रवाना होणार आहे. त्याचा मृतदेह परत आणण्याची व्यवस्था बंगाल क्रिकेट असोसिएशन करणार आहे. बंगालचा माजी कॅप्टन दीप दास गुप्तानंही मुर्तझा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.