मराठी बातम्या /बातम्या /देश /

Assembly Election Result 2021: विजयी होऊनही ममता पराभूत, DMK चा दणका; विधानसभा निवडणूक निकालांची वैशिष्ट्ये एका क्लिकवर

Assembly Election Result 2021: विजयी होऊनही ममता पराभूत, DMK चा दणका; विधानसभा निवडणूक निकालांची वैशिष्ट्ये एका क्लिकवर

Assembly Election Result 2021 updates: पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आता जवळपास स्पष्ट झाले आहेत.

Assembly Election Result 2021 updates: पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आता जवळपास स्पष्ट झाले आहेत.

Assembly Election Result 2021 updates: पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आता जवळपास स्पष्ट झाले आहेत.

  • Published by:  Sunil Desale
मुंबई, 2 मे: पश्चिम बंगाल (West Bengal), तमिळनाडू (Tamil Nadu), केरळ (Kerala), आसाम (Assam) आणि पुदुच्चेरी (Pudducherry) या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. निवडणुकीचे संपूर्ण निकाल जाहीर झाले नसले तरी आत्ता समोर जे कल येत आहेत त्यावरुन कुठल्या राज्यात कोणाची सत्ता येणार हे जवळपास स्पष्ट झालं आहे. पश्चिम बंगालमध्ये ममतांच्या तृणमूल काँग्रेसने बहुमताचा आकडा गाठल्याचं स्पष्ट चित्र दिसत आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची विजयी हॅटट्रिक पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत. आतापर्यंतच्या ट्रेंडनुसार तृणमूल काँग्रेस पक्षा (TMC)ने बहुमताचा आकडा ओलांडला आहे. अशा प्रकारे ममता दीदींच्या तृणमूल काँग्रेसने विजयाची हॅटट्रिक केल्याचं दिसत आहे. तर विरोधात असलेल्या भाजपला 100चा आकडाही ओलांडता आलेला नाहीये. यंदाच्या निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत होती. विययी होऊनही पराभूत झाल्या ममता नंदीग्राम विधानसभा मतदारसंघात ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आणि भाजपचे शुभेंदू अधिकारी यांच्यात थेट लढत होती. ममता बॅनर्जी यांचा या जागेवर 1737 मतांनी पराभूत झाल्या आहेत. ममता बॅनर्जी यांनी 20 मे 2011 रोजी प्रथम मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर 27 मे 2016 रोजी दुसऱ्यांदा ममता दीदी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र, या निवडणुकीत ममतांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकीत मोठा ट्वीस्ट, ममतादीदी नंदीग्राममधून पराभूत तमिळनाडूमध्ये कोणाची सत्ता येणार? जयललिता आणि करुणानिधी यांच्या निधनानंतर झालेल्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत मोठे फेरबदल झाल्याचं पहायला मिळालं. जयललिता यांची वारसदार म्हणून कार्यभार सांभाळणाऱ्या ई पलानीसामी यांची खूर्ची धोक्यात असल्याचं दिसत आहे. आता समोर आलेल्या ट्रेंड्सनुसार पलानीसामी यांच्या एआयएडीएमके पक्ष बहुमताच्या आकड्यापासून खूपच दूर आहे. या निवडणुकीत AIADMK आणि भाजप एकत्रित निवडणुकीच्या रिंगणात होते. तर दुसरीकडे डीएमके आणि काँग्रेस एकत्रित निवडणुकीच्या रिंगणात होते. सध्याच्या ट्रेंडनुसार डीएमके आणि काँग्रेस यांची सत्ता येणार हे स्पष्ट आहे. डीएमकेचे एम के स्टॅलिन मुख्यमंत्री होऊ शकतात. आसाममध्ये भाजपचं सरकार आसामच्या जनतेने पुन्हा एकदा भाजपवर विश्वास दाखवला आहे. आतापर्यंतच्या ट्रेंडनुसार सोनोवाल हे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनणार असल्याचं दिसत आहे. 1946पासून आसामच्या राजकारणात आतापर्यंत सलग दुसऱ्यांदा कुणीही मुख्यमंत्री झालेलं नाहीये. सोनोवाल यांनी 24 मे 2016 रोजी पहिल्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. येथे भाजपने आसाम गण परिषद आणि युनायटेड पीपल्स पार्टी लिब्रल यांच्यासोबत निवडणूक लढवली होती. वाचा: बेळगावात भाजपचं कमळ फुललं, काँग्रेसचं विजयाचं स्वप्न विरलं केरळात दुसऱ्यांदा विजयन मुख्यमंत्री होण्याची शक्यता डाव्यांची सत्ता आता फक्त केरळमध्ये आहे. केरळमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)ने इतर 12 पक्षांसोबत मिळून निवडणूक लढवली होती. आतापर्यंतच्या ट्रेंडनुसार, केरळमध्ली एलडीएफ जिंकणार हे स्पष्ट दिसत आहे. जर एलडीएफने विजय मिळवला तर 77 वर्षीय पिनाराय विजयन हे सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदावर विराजमान होतील. तर दुसरीकडे काँग्रेसप्रणित युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटचे सरकार स्थापन करण्याचे स्वप्न यावेळी सुद्धा पूर्ण होत नाहीये. येथे भाजपने सुद्धा आपली ताकद लावली होती मात्र, त्यांना फारसे यश मिळवता आलेले नाहीये. पुदुच्चेरीत प्रथमच भाजपचे सरकार? केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुदुच्चेरीत कोणाची सत्ता येणार यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेलं नाहीये. मात्र, भारतीय जनता पक्षाची येथे सत्ता येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ऑल इंडिया एनआर काँग्रेस अर्थात AINRC च्या नेत्रृत्वाखाली भाजप आणि एआयडीएमके ट्रेंडमध्ये आघाडीवर दिसत आहे. जर एआयएनआरसी आघाडीला येथे सरकार बनवण्यात यशस्वी झाले तर AINRCचे अध्यक्ष एन रंगास्वामी हे मुख्यमंत्री होऊ शकतात.
First published:

Tags: Assembly Election 2021, Tamil nadu, West bengal

पुढील बातम्या