मराठी बातम्या /बातम्या /देश /West Bengal Assembly Election: नंदीग्रामध्ये सुपर ओव्हरचा थरार! शेवटच्या क्षणापर्यंत दीदी वि. शुवेंदू सामना असा रंगला

West Bengal Assembly Election: नंदीग्रामध्ये सुपर ओव्हरचा थरार! शेवटच्या क्षणापर्यंत दीदी वि. शुवेंदू सामना असा रंगला

Nandigram election result: एखाद्या क्रिकेट सामन्यात शेवटच्या बॉलपर्यंत सामना रंगतो, तसाच काहीसा प्रकार पश्चिम बंगालच्या नंदीग्राम मतदारसंघात पाहायला मिळाला.  काय झालं कसं झालं.. Ball by Ball Report

Nandigram election result: एखाद्या क्रिकेट सामन्यात शेवटच्या बॉलपर्यंत सामना रंगतो, तसाच काहीसा प्रकार पश्चिम बंगालच्या नंदीग्राम मतदारसंघात पाहायला मिळाला. काय झालं कसं झालं.. Ball by Ball Report

Nandigram election result: एखाद्या क्रिकेट सामन्यात शेवटच्या बॉलपर्यंत सामना रंगतो, तसाच काहीसा प्रकार पश्चिम बंगालच्या नंदीग्राम मतदारसंघात पाहायला मिळाला. काय झालं कसं झालं.. Ball by Ball Report

कोलकाता, 2 मे : एखाद्या क्रिकेट सामन्यात शेवटच्या बॉलपर्यंत सामना रंगतो, तसाच काहीसा प्रकार पश्चिम बंगालच्या नंदीग्राम मतदारसंघात पाहायला मिळाला. फक्त बंगाली जनतेचं नव्हे तर साऱ्या देशाचं लक्ष या लढतीकडे लागलं होतं. ममता बॅनर्जी स्वतः नंदीग्राममधून भाजपला खुलं आव्हान देत रिंगणात उतरल्या होत्या. त्यामुळे ही लढत दोन्ही बाजूंनी प्रतिष्ठेची होती. IPL च्या सुपरओव्हरला लाजवेल असा थरार प्रत्येक फेरीच्या मतमोजणीत पाहायला मिळाला. एकदा ममता बॅनर्जी जिंकल्याची बातमी आली. वीस मिनिटांत ममता नंदीग्राममधून हरल्या, असं सांगण्यात आलं. मग ममतांनी नंदीग्राममधला जनतेचा कौल मान्य केल्याचं म्हणजे हार मान्य केल्याचं वक्तव्य आलं आणि अचानक TMC ने नवाच डाव टाकला. 'अजून मतमोजणी संपलेली नाही. अफवा पसरवू नका,' असं ट्वीट TMC च्या अधिकृत हँडलवरून करण्यात आलं. आता तर त्यापुढे हा डाव गेला आहे.

बेळगावात भाजपचं कमळ फुललं, काँग्रेसला पंजा पडला

अगदी थोड्या फरकाने शुवेंदू अधिकारी आणि ममता बॅनर्जी यांच्या मतांमध्ये अंतर पडत होतं. प्रत्येक फेरीच्या शेवटी कधी अधिकारी आघाडीवर येत होते, तर कधी ममता बॅनर्जी. काही वृत्तवाहिन्यांनी ममता जिंकल्याचं जाहीरही केलं. थोड्याच वेळात त्या हरल्या असंही जाहीर केलं. वास्तविक अंतिम मतमोजणी अद्याप झालेली नाही. अजूनही काही मतांची मोजणी सुरू आहे. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका असं तृणमूलकडून सांगण्यात येत होतं.

नंदीग्रामचा निकाल काहीही लागो, जनतेचा कौल आपल्याला समजला आहे, अशा ममता बॅनर्जींच्या या वक्तव्याने त्यांनी नंदीग्रामची हार मान्य केल्याचं समजलं गेलं. त्यामुळे काही वेळापूर्वी ममता जिंकल्या अशा बातम्या देणाऱ्या वाहिन्यांनी पुन्हा ममता हरल्या हे सांगायला सुरुवात केली.

ममता बॅनर्जी 1857 मतांनी हरल्याचं सांगण्यात येत आहे. पण अद्याप अधिकृतपणे निवडणूक आयोगाने तसं जाहीर केलेलं नाही.

संध्याकाळी 7.30 ला आलेल्या ताज्या बातमीनुसार, निवडणूक आयोगाने शुवेंदू अधिकारी नंदीग्राममधून जिंकल्याचं जाहीर केलं. ममता बॅनर्जींविरोधातला सामना शुवेंदू अधिकारी यांनी 1737 मतांनी जिंकला.

काय झालं आणि कसं झालं

सकाळी  9 ते दुपारी 1: मतमोजणीच्या सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये भाजपचे शुवेंदू अधिकारी आघाडीवर होते. ममता बॅनर्जी यांच्यात आणि अधिकारी यांच्यात

1.00 - दुपारनंतर ममता बॅनर्जी यांनी आघाडी घेतली. त्या 2700 मतांनी आघाडीवर होत्या.

3.00 - दुपारी तीन वाजल्यानंतर ममता बॅनर्जी यांची आघाडी थोडी कमी झाली.

4.00 - चारच्या सुमारास ममता बॅनर्जी साधारण हजारभर मतांनी आघाडीवर होत्या. त्या वेळी मतमोजणीची 17 वी फेरी सुरू होती.

6.00 - ममता बॅनर्जी नंदीग्राम मतदारसंघातून विजयी झाल्या आहे, त्यांनी भाजपचे उमेदवार सुवेंद्र अधिकारी यांचा अवघ्या 1200 मतांनी पराभव केला आहे, असं काही माध्यम संस्थांनी जाहीरही केलं.

6.15- जवळपास 1800 मतांनी पराभूत झाल्याची बातमी

6.30 - मतमोजणी अजून सुरू आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका, असं TMC कडून ट्वीट

7.00 - निवडणूक आयोगाच्या नियमानुसार सर्व मतमोजणी झाल्यानंतर VVPAT मशीनच्या रिसीट्सच (किमान 5 टक्के) निकालाशी जुळतात की नाही हे तपासलं जातं. या फेरतपासणीनंतर विजयी उमेदवार जाहीर होतो.

7.30 - निवडणूक आयोगाने केलं जाहीर. ममता बॅनर्जींविरोधातला सामना शुवेंदू अधिकारी यांनी 1737 मतांनी जिंकला.

First published:
top videos

    Tags: Assembly Election 2021, BJP, Mamata banerjee, West Bengal Election