अनिरुद्ध शुक्ल, बाराबंकी, 12 एप्रिल: कोरोना व्हायरसचे (Coronavirus) संक्रमण थांबवण्यासाठी प्रत्येक राज्य खबरदारी घेत आहे. उत्तर प्रदेशमध्ये बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या नागरिकांना होम क्वारंटाइन राहण्याचे सांगण्यात आले आहे. मात्र गुजरातमधून बाराबंकीमध्ये आलेल्या एका वृद्धाबरोबर होम क्वारंटाइनमध्ये घडलेला प्रकार अत्यंत हृदयद्रावक आहे. या 82 वर्षाच्या वृद्धाला होम क्वारंटाइन (Home Quarantine) ठेवण्यात आले होते. शनिवारी त्यांचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत त्यांच्या घरामध्ये आढळला. या घटनेनंतर स्थानिक प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. (हे वाचा- ‘कोरोना’वर शोधणार आता आयुर्वेदीक उपाय, PM मोदींनी तयार केला टास्क फोर्स ) बाराबंकीमध्ये मोहम्मदपूर खाला पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बढनापूर गावामध्ये एका वृद्धाचा मृत्यू झाला. काही आठवड्यांपूर्वी सदर वृद्ध व्यक्ती गुजरातमधून बाराबंकीमध्ये आला होता. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाकडून त्याला 22 मार्चपासून होम क्वारंटाइन राहण्यास सांगितले. त्यांच्यावर घरातून बाहेर पडण्यास तसंच कोणत्याही व्यक्तीची भेट घेण्यास बंदी घालण्यात आली. शनिवारी त्यांच्या घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने गावकऱ्यांनी स्थानिक प्रशासनाकडे धाव घेतली. ही दुर्गंधी इतकी होती की त्याठिकाणी उभं राहणंही शक्य नव्हते, असे त्याठिकाणचे गावकरी सांगतात. कसेबसे गावकरी मृतदेहाजवळ पोहोचले तर त्यामध्ये किडे पडले होते. याचा अर्थ असाच होतो की, त्या वृद्धाचा मृत्यू होऊन काही दिवस झाले होते. (हे वाचा- वादातून महिलेने उचललं धक्कादायक पाऊल, पोटच्या लेकरांना दिलं गंगेत फेकून ) प्रशासनाने त्या वृद्धास होम क्वारंटाइन राहण्यास सांगितल्यामुळे फारसं कुणी त्यांच्याशी बोलायला जायचे नाहीत. फार कमी वेळा ते रेशन घेताना दिसले होते. त्यांच्या घरातून दुर्गंध येऊ लागल्याने त्यांच्या मृत्यूबद्दल समजले. गावकरी सांगतात की, मृतदेहावरील किडे इतके होते की ते बाजुच्या भींतीवर देखील रेंगाळू लागले होते. 4 एप्रिल 2020 रोजी त्याठिकाणी आशा वर्करने येऊन नोटीस देखील लावली होती. मात्र या सगळ्याबद्दल काहीच माहित नसल्याचं त्या सांगतात. दरम्यान हे वृद्ध आजोबा घरात एकटेच राहायचे. जिद्दी स्वभावामुळे जेवणही स्वत:च बनवायचे. त्यांचा मृत्यू 4-5 दिवसांपूर्वी झाला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. कारण 1-2 दिवसांपूर्वी मृत्यू झाला असल्यास इतक्या लवकर मृत शरिरामध्ये किडे पडत नाहीत. CMO नी दिली ही माहिती बाराबंकीमधील मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश चंद्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘गुजरातमधून आल्यानंतर होम क्वारंटाइन केलेल्या वृद्धाचा मृत्यू झाला. त्यांच्या मृतदेहामध्ये किडे पडण्याबाबत आता काही बोलू शकत नाही. त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणं नव्हती, पण त्यांची नमुने चाचणीसाठी पाठवले आहेत. रिपोर्ट आल्यानंतर निश्चित काय ते कळेल.’ संपादन- जान्हवी भाटकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.