जाहिरात
मराठी बातम्या / देश / पतीसोबत झालेल्या वादानंतर पत्नीचं धक्कादायक कृत्य, पोटच्या पाचही लेकरांना दिलं गंगेत फेकून

पतीसोबत झालेल्या वादानंतर पत्नीचं धक्कादायक कृत्य, पोटच्या पाचही लेकरांना दिलं गंगेत फेकून

पतीसोबत झालेल्या वादानंतर पत्नीचं धक्कादायक कृत्य, पोटच्या पाचही लेकरांना दिलं गंगेत फेकून

सध्या स्थानिक पोलिसांकडून या मुलांचा शोध घेतला जात आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

भदोही, 12 एप्रिल : उत्तर प्रदेशातील भदोही जनपद येथील गोपीगंज पोलीस हद्दीतील जहांगीराबाद गंगा घाटावर एका महिलेने आपल्या 5 मुलांना गंगा नदीत (Ganga River) फेकून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. स्थानिक पाणबुड्यांकडून पाचही मुलांचा शोध घेतला जात आहे. महिलेने दिलेल्या माहितीनुसार तिचं नवऱ्यासोबत भांडण झालं होतं. त्यामुळे रागाच्या भरात तिने आपली पाचही मुलं नदीत फेकून दिली. जहांगीराबाद गावात राहणाऱ्या या महिलेचं नाव मंजू यादव असं आहे. ती शनिवारी रात्री उशीरा आपल्या मुलांना घेऊन गंगेजवळ गेली. तेथे तिने आपल्या पाचही मुलांना फेकून दिले.  वंदना (12), रंजना (10), पूजा (6), शिव शंकर (8) आणि  संदीप (5) अशी मुलांची नावं आहेत. महिलेने दिलेल्या माहितीनुसार पहिल्यांदा महिलेने आपल्या तीन मुलांना गंगेत फेकून दिलं त्यानंतर अन्य दोन मुलांना गंगेत फेकून ती घरी निघून आली. पोलिसांकडून मुलांचा तपास सुरू सांगितले जात आहे की, ज्यावेळी महिला मुलांना घेऊन गंगा घाटावर पोहोचली, तेव्हा तिचा पती घरी नव्हता. जशी ही माहिती गावात आणि कुटुंबीयांपर्यंत पोहोचला तशी खळबळ माजली. गावकरांनी तत्काळ याची माहिती पोलिसांना दिली. गोपीगंज पोलीस स्थानिक गोताखोरांच्या मदतीने मुलांचा शोध घेत आहेत. जवळील अनेक पाणबुड्यांना मुलांचा तपास करण्याची सूचना पोलिसांनी दिली आहे. जिल्हाधिकारी राजेंद्र प्रसाद आणि पोलीस अधीक्षक राम बदन सिंग हे घटनास्थळी हजर झाले. त्यांनी मुलांचा शोध घेण्याची प्रक्रिया वेगाने करावी, अशी मागणी केली आहे. सिंह यावेळी म्हणाले की, महिलेने सांगितले की तिने मुलांना गंगेत फेकून दिले आहे. त्यानुसार पोलीस मुलांचा शोध घेत आहे. संबंधित -  तबलिगींवर कारवाईचा बडगा, क्वारंटाइन संपतात तुरुंगात रवानगी बेळगाववमध्ये चिंता वाढली, आणखी 4 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: crime
  • First Published :
जाहिरात
जाहिरात