नवी दिल्ली 12 एप्रिल : कोरोनाने जगभर धुमाकूळ घातलाय. त्यावर अजुन औषध मिळालेलं नाही. त्यामुळे त्याला अटकाव करण्यासाठी काय करता येईल यावर संशोधन सुरू आहे. अनेक देशांनी त्यावर लस शोधण्याचा दावा केलाय. भारतातही त्यावर संशोधन सुरू आहे. केंद्रीय आयुष मंत्रालयाने आता कोरोनावर उपाय शोधण्यासाठी टास्क फोर्स तयार तयार केला आहे. आयुष मंत्रालय आणि ICMR मिळून हे संशोधन करणार आहे. प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेदात अनेक उपाय सांगितलेले आहेत. त्यामुळे वेगळ्या अंगाने काही संशोधन करता येऊ शकते का याचं संशोधन हा टास्क फोर्स करणार आहे. आयुर्वेदीक आणि होमिओपॅथीच्या माध्यमातून वैज्ञानिक आणि आयुर्वेदीक-होमिओपॅथिक डॉक्टर्स यावर उपाय शोधणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत आयुष मंत्रालयाला सूचना केली होती. भारतात कोरोना व्हायरस एप्रिल महिन्यात वेगानं वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार 24 तासांत 909 नवीन लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं रिपोर्टमधून समोर आलं आहे. तर अद्यापही 2 हजार नागरिकांचे रिपोर्ट्स येणं बाकी आहे. धक्कादायक बाब म्हणजे 24 तासांत कोरोनामुळे 34 तर आतापर्यंत 273 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत भारतात रुग्णांची संख्या 8,356 वर पोहोचली आहे. त्यापैकी 7,367 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 716 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामध्ये सर्वात लहान 6 वर्षांच्या चिमुकल्याचाही समावेश आहे. मास्कवरून केलेली मस्करी पडली महागात, tiktok स्टारला कोरोनाची लागण महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या 24 तासांमध्ये राज्यात तब्बल 134 रुग्णांची संख्या वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी 113 रुग्ण हे मुंबईतच आढळले आहे. हातात 22 दिवसांचं बाळ,पण कोरोनाला रोखण्यासाठी या महापालिकेच्या आयुक्त कामावर हजर महाराष्ट्राला कोरोना व्हायरसने घातलेला विळखा वाढतच चालला आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्याही 1895 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासात मुंबई, पुणे, मीरा भाईंदर, नवी मुंबई, ठाणे आणि वसई विरारमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.