Home /News /national /

भर दुपारी आलेल्या गूढ आवाजाने बंगळुरू हादरलं; काय झालं नेमकं?

भर दुपारी आलेल्या गूढ आवाजाने बंगळुरू हादरलं; काय झालं नेमकं?

अचानक जोरदार धाडकन आवाज झाला. कसला आवाज आहे हे कळेपर्यंत थोडा हादराही जाणवला. हा भूकंप नसल्याचे भूवैज्ञानिकांनी स्पष्ट केल्यानंतर या आवाजाचं गूढ आणखीनच वाढलं.

    बंगळुरू, 2o मे : लॉकडाऊन शिथिल झाला तरी, बंगळुरूची दुपार शांतच होती. अशातच दीडच्या सुमारास अचानक जोरदार धाडकन आवाज झाला. कसला आवाज आहे हे कळेपर्यंत थोडा हादराही जाणवला. भूकंप झाला अशा भीतीने आणि आवाजाची धडकी बसल्याने लोक पटापट घराबाहेर आले. पण हा आवाज भूकंपामुळे नसल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे. संपूर्ण शहरात हा जोरदार आवाज ऐकू आला. एखाद्या अमानवी अवकाशीय आवाजासारखा तो ध्वनी वाटल्याचं काही बंगलोरवासीयांनी सोशल मीडियावर लिहिलं आहे. आवाजाबरोबर जमीन हादरल्याने सुरुवातीला भूकंप झाल्याची चर्चा होती. पण सेसमोग्राफवर जमिनीखाली कुठलीही क्रिया नोंदवली गेलेली नाही. त्यामुळे भूकंपाची शक्यता हवामान खात्याने फेटाळून लावली आहे. त्यानंतर या आवाजाचं गूढ आणखीनच वाढलं आहे. कर्नाटकच्या नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन केंद्राचे संचावर श्रीनिवास रेड्डी यांनी भूकंपाची शक्यता फेटाळून लावली आहे. Cyclone Amphan : चक्रीवादळ धडकलं; पुढचे 4 तास सुरू राहणाऱ्या हाहाकाराची झलक एखाद्या सुपरसॉनिक विमानाच्या उड्डाणासारखा किंवा फायटर जेटचा हा आवाज वाटला. पण हिंदुस्तान एरोनॉटिक्सने अशी कुठली अॅक्टिव्हिटी झाली नसल्याने तीही शक्यता फेटाळली गेली आहे. बंगळुरूच्या पूर्व भागात प्रामुख्याने हा आवाज अधिक तीव्रतेने आला. एअर फोर्सकडून कुठली चाचणी केली गेली का याची तपासणी करण्यात येत आहे. पण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे अशी कुठलीही माहिती अद्याप आलेली नाही. कुठलंही नुकसान, स्फोट वगैरे नोंदवलं गेलेलं नाही. यामुळे या आवाजाचं गूढ अधिकाधित वाढतच आहे. पुण्यात प्रतिबंधित क्षेत्रात नागरिकांचा उद्रेक, रस्त्यावर उतरल्या शेकडो महिला
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Bangalore, Sonic

    पुढील बातम्या