रायपूर, 27 मे : छत्तीसगडमधील (Chhattisgarh News) दुर्ग जिल्ह्यातील रानीतराई पोलीस ठाणे हद्दीतून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात पतीनेच आपल्या पत्नीची हत्या केली. सासरच्यांनी पतीला मारहाण केली होती. यामुळे पतीने पत्नीची हत्या केल्याचं उघडकीस आलं आहे. हत्येनंतर पत्नीला गळफास लावून लटकवलं… 17 मे रोजी यदु नावाच्या महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची सूचना पोलिसांना मिळाली होती. पोलीस या प्रकरणात तपास करीत होते. तपासादरम्यान महिलेच्या पोस्टमार्टम रिपोर्टमधून धक्कादायक वृत्त समोर आलं. यानुसार, महिलेने आत्महत्या नाही तर तिची हत्या केल्याचं समोर आलं. पोलिसांनी या प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. या प्रकरणात महिलेच्या पतीवर पोलिसांचा संशय होता. म्हणून त्यांनी पतीला ताब्यात घेत त्याची चौकशी केली. सुरुवातील त्याने हत्या केल्याचं मान्य केलं नाही. पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर पतीने पत्नीची हत्या केल्याचं कबुल केलं. यानंतर पोलिसांनी आरोपी पतीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केलं. काय आहे संपूर्ण प्रकरण? देवांश राठोडने (एसडीओपी, पाटना) यांनी सांगितलं की, काही दिवसांपूर्वी मृत महिला आणि तिचा पती आपल्या मुलांसह सासरी गेला होता. यादरम्यान मृत महिलेच्या माहेरच्या नातेवाईकांनी पतीला मारहाण केली. यानंतर पती-पत्नीमध्ये वारंवार भांडणं होत होती. त्या दिवशी पती-पत्नीमध्ये यावरुन वाद झाला. आणि पतीने पत्नीचं तोंड दाबून तिची हत्या केली. हे प्रकरण आत्महत्याचं दाखवून तिचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकवला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.