जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / भाचीच्या प्रेमासाठी मामाने आखला भयंकर प्लान; आधी भाईंदर रेल्वे पुलावर नेलं अन्...

भाचीच्या प्रेमासाठी मामाने आखला भयंकर प्लान; आधी भाईंदर रेल्वे पुलावर नेलं अन्...

भाचीच्या प्रेमासाठी मामाने आखला भयंकर प्लान; आधी भाईंदर रेल्वे पुलावर नेलं अन्...

मुंबईतील (Mumbai News) कांदिवली भागात मामा-भाचीच्या नात्याला काळीमा फासणारा प्रकार समोर आला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 26 मे : मुंबईतील (Mumbai News) कांदिवली भागात मामा-भाचीच्या नात्याला काळीमा फासणारा प्रकार समोर आला आहे. कांदिवली पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या 19 वर्षीय तरुणीच्या प्रेमात तिचाच मामा पडला. यादरम्यान भाचीचा प्रियकर मात्र दोघांमधील अडथळा (Crime News) ठरत होता. कांदिवली पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, भाची आणि तिच्या प्रियकरामध्ये दुरावा निर्माण करण्यासाठी मामाने धक्कादायक पाऊल उचललं.  कांदिवली पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, भाचीपासून तिच्या प्रियकराला दूर करण्यासाठी मामाने 12 मे रोजी मुंबईजवळी भाईंदर खाडीवर त्याला घेऊन गेला आणि खूप दारू पाजली. यादरम्यान दीपक कट्टूकर नशेच्या अवस्थेत होता. या परिस्थितीत मुलीचा मामा सूरज विश्वकर्मा त्याला भाईंदरच्या खाडीवरील रेल्वे पुलावर फोटो काढण्याचं कारण सांगून तेथे घेऊन गेला. आणि फोटो काढता काढता त्याला रेल्वेच्या पुरावरुन धक्का मारून खाली पाडलं. दुसरीकडे दीपक दोन दिवस झाले तरी घरी परतला नव्हता, म्हणून 14 मे रोजी त्याच्या कुटुंबीयांनी कांदिवली पोलीस ठाण्यात सूरज बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरू केला, त्यावेळी सूरजने दीपका कांदिवली रेल्वे स्टेशन हून भाईंदरच्या दिशेने घेऊन गेल्याचं कळालं. मात्र तोपर्यंत वसई पोलिसांनी मृत तरुणाचा मृतदेह बेवारस असल्याचं मानून दफन केलं होतं. शेवटी कांदिवली पोलिसांनी मृत सूरजचा मृतदेह जेसीबीच्या मदतीने बाहेर काढला आणि त्याची मेडिकल टेस्ट केली. शेवटी चौकशीत समोर आलं की, सूरज आणि दीप क दोघे एकाच तरुणीवर प्रेम करीत होते. दरम्यान तरुणीचा मामा सूरजने भाचीचा प्रियकर दीपकची हत्या केली. आधी त्याला खूप दारू पाजली आणि खाडीच्या वरील रेल्वे पुलावरुन धक्का मारला. यात त्याचा मृत्यू झाला. अटक केलेला आरोपी सूरज विश्वकर्मा याचं वय 27 वर्षे असून तो मुलीचा मामा आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात