मराठी बातम्या /बातम्या /देश /देशातले पुरस्कार पटकवणारे जलसंवर्धनाचे प्रकल्प, जाणून घ्या सविस्तर

देशातले पुरस्कार पटकवणारे जलसंवर्धनाचे प्रकल्प, जाणून घ्या सविस्तर

पाणी कमी पडल्यास हे त्रासही होऊ शकतात - त्वचा कोरडी पडणं किंवा त्वचेतील ओलावा कमी होणं
रक्तदाब कमी होणं
मूत्रपिंडाच्या आजारांचा धोका

पाणी कमी पडल्यास हे त्रासही होऊ शकतात - त्वचा कोरडी पडणं किंवा त्वचेतील ओलावा कमी होणं रक्तदाब कमी होणं मूत्रपिंडाच्या आजारांचा धोका

जल संवर्धनाच्या (Water Conservation) दृष्टीनं देशभरात अनेक प्रकल्प राबवले जात आहेत. त्यापैकी काही यशस्वी पुरस्कार प्राप्त प्रकल्पांची माहिती आम्ही देत आहोत.

नवी दिल्ली, 30 सप्टेंबर:  पाणी (Water) म्हणजे जीवन हे सर्वज्ञात आहे. माणसाचं (Human Being) आयुष्य स्वच्छ पाणी आणि स्वच्छतेवर अवलंबून असतं. आपला देश हा मान्सूनच्या (Monsoon) पर्जन्यमानावर अवलंबून असलेला देश असून, दिवसेंदिवस पाण्याची मागणी वाढत असून, त्यामानाने जलसाठे कमी आहेत. त्यामुळं पाणी जपून वापरणं आणि त्याचा साठा वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यावर भर दिला जात आहे. पाण्याची वाढती गरज पूर्ण करण्यासाठीच्या या प्रयत्नांना सर्व समाजाचा हातभार लागणं महत्त्वाचं आहे. जल संवर्धनाच्या (Water Conservation) दृष्टीनं देशभरात अनेक प्रकल्प राबवले जात आहेत. त्यापैकी काही यशस्वी पुरस्कार प्राप्त प्रकल्पांची माहिती आम्ही देत आहोत.

जल संचय प्रकल्प - नालंदा :

शेतीवर (Agriculture) अवलंबून असलेल्या दुष्काळी (Drought) भागातील शेतकऱ्यांना मुबलक पाणी पुरवठा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं बिहारमधील नालंदामध्ये (Nalanda) हा शासकीय उपक्रम सुरू करण्यात आला. शाश्वत उपाय देण्यासाठी या प्रकल्पामध्ये बहुआयामी दृष्टिकोन अवलंबण्यात आला. जास्तीत जास्त बंधारे बांधणं आणि कालवे, पारंपरिक पाणवठ्यांमधून गाळ (Silt) काढण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आलं. त्याचबरोबर पाणी साठवण्याबाबत जनजागृती करण्यावरही भर देण्यात आला. शेतकऱ्यांच्या सामान्य ज्ञानाचा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उपाययोजना राबवण्यात आल्या.

हेही वाचा- कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या भेटीगाठी सुरुच, अमित शहा यांच्या भेटीनंतर आता घेतली या बड्या व्यक्तीची भेट

50 दिवसांत 100 तलाव-एर्नाकुलम:

1980मध्ये केरळमधल्या एर्नाकुलममध्ये (Ernakulam) सुमारे 3000 तलाव होते. 2016 मध्ये ही संख्या कमी होऊन 700 वर आली होती. 2016 मध्ये जिल्ह्यात भीषण दुष्काळ पडला. त्याच्या पुढच्या वर्षी संपूर्ण राज्य दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आलं. यामुळं नागरिकांचं आयुष्य अधिकच खडतर आणि आव्हानात्मक झालं होतं. त्यानंतर ‘100 तलाव 50 दिवस’ या अभिनव प्रकल्पाची घोषणा जिल्हाधिकारी के. मोहम्मद वाय. सफीरुल्ला यांनी केली. लोकांच्या अभूतपूर्व पाठिंब्यामुळे अवघ्या 43 दिवसांत हे उद्दिष्ट्य साध्य करण्यात आलं. आता या जिल्ह्यानं 60 दिवसांत 163 तलाव स्वच्छ करण्याचा टप्पा गाठला आहे. शेती व्यतिरिक्त, कपडे धुण्यासारख्या घरगुती कामांसाठीदेखील तलावाचे पाणी वापरले जाऊ शकते. ही सहज राबवता येण्यासारखी योजना असून, ती देशभरात लागू झाल्यास त्याचा चांगला फायदा होऊ शकेल.

हेही वाचा- कॅप्टन अमरिंदर सिंह यांना मिळणार केंद्रात जागा, BJP सोपवणार मोठी जबाबदारी?, भाजप नेत्याचा दावा

 जीविका प्रकल्प – उधमपूर :

केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीरमधील उधमपूर (Udhampur) या कृषीप्रधान जिल्ह्यात 80 टक्के लोक शेतकऱ्यांवर अवलंबून आहेत. त्यामुळे तिथं शेतीसाठी पाणीपुरवठा अत्यंत महत्त्वाचा आहे. या जिल्ह्यात जलसंवर्धनाच्या दृष्टीनं जीविका (Jeevika) हा अभिनव प्रकल्प राबवण्यात आला. नदी, तलाव, ओढे यातून वाहून जाणारं पाणी कृत्रिम तलावांत साठवण्याचा प्रयोग यात करण्यात आला. शेतीत ठिबक सिंचन प्रणाली राबवण्यावर भर देण्यात आला. त्यामुळे शेतीसाठी मुबलक पाणी मिळू लागलं आणि पाण्याची बचतही झाली. जलसाठे सुरक्षित राहिल्यानं पाणी उपलब्धताही वाढली.

हेही वाचा- Explainer: गेल्या 7 वर्षांत काँग्रेसमध्ये भलंमोठं खिंडार, 177 नेत्यांनी केला पक्षाला रामराम, कोण थांबवणार नेत्यांचं Outgoing

स्वच्छ पाणी आणि स्वच्छता ही केवळ गरज नाही, तर सामूहिक जबाबदारीदेखील आहे. त्यामुळे हे सर्व प्रकल्प ‘इच्छा तिथं मार्ग’ याची प्रचिती देतात. नागरिकांना उत्तम आयुष्य जगता यावं यासाठी जलसंधारण आणि सार्वजनिक स्वच्छता ही दोन्ही उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवून न्यूज 18 (News 18) आणि हार्पिक इंडियाच्या (Harpik India) पुढाकारानं ‘मिशन पाणी’ (Mission Paani) राबवण्यात येत आहे. तुम्हीही यात सक्रीय सहभाग घेऊ शकता. Https://www.news18.com/mission-paani/ वर लॉग इन करा आणि या मोहिमेत सहभागी व्हा.

First published:

Tags: Drink water, Water